दिलीप शिंदे
सोयगाव दि.02- परिवहन महामंडळाच्या सोयगाव आगारातील चार कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा आगारातील कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवा निवृत्ती निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख जवळीकर तर प्रमुख पाहुणे सिल्लोड आगारप्रमुख विजय काळवणे उपस्थित होते.
सोयगाव आगारातील सेवा निवृत्त झालेले लेखाकार कृष्णा कावले, चालक माधव पाटील,बाबूलाल दोधाटे व वाहक सय्यद गुलाब यांचा सोयगाव आगारातील चालक,वाहक,मॅकेनिक व कर्मचाऱ्यांच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला.स्नेहभोजनानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांची सजविण्यात आलेल्या बस मधून कुटुंबासह सोयगाव आगारातून सोयगाव बसस्थानकापर्यंत वाजगाजत मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी कामगार संघटना सचिव संतोष पाखरे, जयराम सूर्यवंशी, अध्यक्ष राजू भोपे, कामगार नेते सुरेश हळनोर, मधुकर शिंदे, विष्णू सोनवणे, चालक,वाहक, आगारातील मॅकेनिक, कर्मचारी आदींसह शहरातील पत्रकार,प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आगारातील वाहक, चालक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते.
0 Comments