श्रीरामाच्या जन्मभूमीला भेट देण्याचा योग,..अनिल गुंजाळ


शिर्डी (प्रतिनिधी)

आयोध्या ( अनिल गुंजाळ) देशातील सर्वात प्रसिद्ध व ऐतिहासिक महत्त्व असणारे धार्मिक शहर म्हणजे आयोध्या होय.  सर्वांचे दैवत असणाऱ्या व मोठी श्रद्धा असणाऱ्या श्रीरामाच्या जन्मभूमीला भेट देण्याचा नुकताच सर्व ग्रुपला बरोबर घेऊन योग आला. आणि श्रीरामाचे दर्शन मनोभावे दर्शन झाले . मोठे समाधान व आनंद त्यामुळे सर्वांनाच मिळाला. भव्य दिव्य अशा असणाऱ्या या मंदिरामध्ये श्रीराम लल्लाचे दर्शन घेतल्यानंतर एक आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होऊन मनाला मोठे समाधान वाटले.

 अनेक दिवसाची इच्छा येथील श्री रामाच्या दर्शनाने रामकृपेने पूर्ण झाली. देशातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक नागरिकाला, वृद्धांना व लहान मुलांना अयोध्या व श्रीराम माहित आहे. अशा या तीर्थस्थळी जाऊन दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले व धन्य धन्य झालो. अयोध्या हे उत्तर प्रदेशातील एक धार्मिक व हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाणारे पवित्र शरयू नदीच्या काठावर वसलेले शहर असून येथे प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. पूर्वी येथे छोटे छोटे रस्ते गल्ल्याबोळा अस्वच्छता अशी परिस्थिती होती .मात्र येथे श्रीरामाचे नवीन मंदिर झाले आणि सर्व रस्ते, गल्ल्या सुधारल्या, रस्ते मोठे झाले, सर्वत्र स्वच्छता दिसते. रस्ते मोठे झाले, मंदिर तर भव्य दिव्य झाले आहे. स्वच्छता वाढली. सर्व घाट अतिशय सुशोभित केले गेले आहेत. 22 जानेवारी 2024 रोजी या भव्य दिव्य अशा श्री प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन झाले तेव्हापासून अयोध्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. पूर्वी या जागेवर बाबरी मशीद होती. ती 1992 मध्ये पाडले गेली व त्यानंतर येथे राम मंदिराचे न्यायालयाच्या निकालानंतर काम सुरू झाले . 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत या मंदिराचे उद्घाटन व श्रीराम लल्लांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर येथे दररोज मोठी गर्दी होत आहे. चित्रकूट, प्रयागराज किंवा काशीला गेल्यानंतर प्रत्येक भाविक अयोध्याला जातोच. कारण येथे जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यायचंच इतका ध्यास या भाविकांमध्ये पाहायला मिळत आहे. आयोध्या मध्ये रेल्वे ,बस मार्ग आहे. राहण्याची चांगली व्यवस्था आहे. येथे श्रीरामाचे असणारे भव्य दिव्य मंदिर सर्वांचेच एक मोठे आकर्षण ठरत आहे. गर्दी व सुरक्षा मुळे येथे
राम मंदिरात जाताना पाच सुरक्षेचे टप्पे आहेत. इथे तुमची तपासणी होते. प्रथम भव्य अशा सिंह द्वारातून  राम मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर इथं 32 पायऱ्या आहेत. वृद्ध किंवा अपंग व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी इथे व्हीलचेअरची सुविधा देखील उपलब्ध आहेत. मंदिरात जाण्यापूर्वी मोठे पटांगण रस्ते आहेत.  व सुशोभित असा मंदिर परिसर बनवण्यात आला आहे. राम मंदिरातील आरतीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर  पास घ्यावा लागतो. या पाससाठी तुम्हाला आयडी प्रुफ द्यावा लागतो. मंदिर परिसरात प्रवेश करतानाच लोकर च्या शेजारीच पास मिळतो.आयडी प्रुफ दिल्यानंतर तुम्हाला पास दिला जातो. हा पास असेल, तरच तुम्ही रामलल्लाच्या आरतीत सामील होऊ शकता. मात्र मोजक्याच लोकांना पहाटेच्या मंगल आरतीसाठी पास दिला जातो.
श्रीराम मंदिरात श्री रामलल्लाची दररोज आरती होते. मंगला आरती सकाळी 4. 30, श्रृंगार आरती, सकाळी 6.30-7 यावेळात होते. भोग आरती सकाळी 11. 30, संध्या आरती संध्याकाळी 6.30, भाग आरती रात्री 9, शयन आरती रात्री 10 वाजता होते.राम मंदिर परिसरात मोफत प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरती दर्शनानंतर राम जन्मभूमी ट्रस्टकडून मोफत प्रसाद दिला जातो.
सुरक्षेच्या कारणास्तव राम मंदिर परिसरात फोन, चार्जर, वॉलेट, चावी, इलेक्ट्रॉनिक सामान घेऊन जायला बंदी आहे. राम मंदिर परिसरात गेलात आणि या पैकी काही वस्तू तुमच्याकडे असतील. तर तिथल्या लॉकरमध्ये तुम्ही या वस्तू ठेवू शकता. तशी ट्रस्टने सोय केली आहे.यासाठी कोणतीही रक्कम आकारली जात नाही. येथे स्वच्छ थंडगार पाणी उपलब्ध आहे. भव्य दिव्य परिसर व लाल दगडातील हे भव्य दिव्य मंदिर पाहून प्रत्येक जण अवाक झाल्याशिवाय राहत नाही. असे कलाकुसरीचे हे मंदिर भारतात एक भव्य दिव्य व प्रसिद्ध असे असून ते  सर्वांच्या अध्यात्मिक आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. मंदिरातील श्रीराम लल्लाची ही मूर्ती 5 वर्षाच्या मुलाच्या रूपात बनवण्यात आली आहे, ज्यामध्ये रामलल्लांचे बालस्वरूप दगडाच्या कमळावर बसलेले दाखवण्यात आले आहे. मंदिरात मूर्तीचे दर्शन झाल्यानंतर अगदी प्रसन्न व  अध्यात्मिक ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे समाधान मिळते. श्री राम मंदिरा नंतर येथे दर्शनासाठी अनेक मंदिर आहेत.अयोध्या ही घाट आणि मंदिरांसाठी प्रसिद्ध नगरी आहे. शरयु नदीच्या काठावर अयोध्या नगरी वसलेली आहे. शरयु नदीच्याकाठावर   14 प्रमुख घाट आहे. यात गुप्तद्वार घाट, कैकई घाट, कौशल्या घाट, पापमोचन घाट, लक्ष्मण घाट इत्यादी  विशेष उल्लेखनीय आहे. घाटावर येथे सायंकाळी गंगेचीआरती होते.
 तर अयोध्येच्या मध्यभागी श्री हनुमानगढी असून टेकडीवर श्री हनुमानाचे प्रसिद्ध मंदिर आहे. येथे दर्शनासाठी मोठी गर्दी असते. लाडूचा भोग व प्रसाद येथे दिला जातो . येथील दर्शन ही खूप महत्त्वाचे आहे.
 हनुमानगढ़ी क्षेत्रा मध्येच दंतधावन कुंड आहे. जिथे प्रभू श्रीराम आपल्या दातांची स्वच्छता करायचे. यालाचा राम दतौन म्हणतात.  कनकभवन मंदिर हे प्रसिद्ध मंदिर आहे अयोध्यामध्ये कनकभवन मंदिर पण बघण्यासारखे आहे. जिथे श्रीराम आणि जानकीची सुंदर मूर्ती ठेवलेली आहे. 
 अयोध्यामध्ये राजा दशरथ यांचे  महल खुप प्राचीन आणि विशाल आहे.  अयोध्यामध्ये एक दिगंबर जैन मंदिर आहे. जिथे ऋषभदेवजी यांचा जन्म झाला होता. अयोध्यामध्ये आदिनाथ व्यतिरिक्त अजितनाथ, अभिनंदननाथ, सुमतिनाथ आणि अनंतनाथ यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मस्थळावर पण मंदिर बनले आहे. असे मंदिरांचे, घाटांचे शहर व श्रीरामाचे असे  महत्त्वाचे शहर म्हणून आयोध्या असून या ठिकाणी दर्शन एकदा तरी प्रत्येकाने जाऊन घ्यावे व श्री रामाचा जयजयकार करावा असे मनोमन वाटते.

Post a Comment

0 Comments