प्रयागराज( राजकुमार गडकरी) दर वर्षी वट सावित्री पूजा ही एक हिंदू महिलांद्वारे त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केली जाणारी पूजा आहे. ही पूजा दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी उत्तर भारतात अनेक ठिकाणी साजरी केली जाते,ती यावर्षी 26 मे 2025 रोजी मोठ्या उत्साहात प्रयागराज येथे साजरी होताना दिसते.
महाराष्ट्रात मात्र ही वटसावित्री पूजा पौर्णिमेला म्हणजे दहा किंवा अकरा जून 2025 रोजी साजरी होणार आहे असे समजते. मात्र येथे आज सोमवारी ती साजरी होत आहे. प्रयागराजमध्ये, या पूजेसाठी वटवृक्षा जवळ मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येतात आणि पूजा करतात. प्रयागराज येथील महर्षी भारद्वाज ऋषी आश्रमामध्ये असलेल्या वडाची महिला मोठ्या संख्येने पूजा करताना दिसत होत्या.
सुहासिनी महिला वट सावित्रीचे व्रत ठेवतात, जे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी असते.
प्रयागराज मध्ये वटवृक्षाला बरगद असे म्हणतात. या वटवृक्षाला येथे महिला पूजा करून पाणी, दूध, मध आणि दही अर्पण करत होत्या. तसेच, वटवृक्षाला वस्त्र, अक्षता आणि फुलांनी सजवून आणि प्रत्येक क्षणांवरून मनोभावे पूजा करताना अनेक महिला येथे सोमवारी 26 मे 2025 रोजी सावित्री पूजा करताना दिसून आल्या. महाराष्ट्रात वटसावित्री पूजा ही वटपौर्णिमेला केली जाते. मात्र येथे अमावस्याला सावित्री पूजा करताना महिला दिसत होत्या.
महिला वटवृक्षाला सात किंवा अकरा वेळा परिक्रमा करत प्रत्येक फेऱ्यात पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करताना दिसत होत्या. या दिवशी येथे काही ठिकाणी कथा सुरू होती.
सावित्री आणि सत्यवान यांच्या कथेचे श्रवण महिला करताना दिसत होत्या.
वट सावित्री व्रताला खूप महत्त्व आहे, कारण ते महिलांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी केलेले असते. या व्रताद्वारे, महिलांना अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्याचे आशीर्वाद मिळतात.
प्रयागराजमध्ये, वट सावित्री पूजा मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. महिला वटवृक्षाच्या जवळ एकत्र येऊन पूजा करतात, कथा श्रवण करतात आणि परिक्रमा करतात. संगम नदीच्या काठावर, अक्षय वट, महर्षी भारद्वाज ऋषी आश्रमातही असलेल्या वट वृक्षाची व शहरातील ठिकाणी असणाऱ्या शिवालया जवळ वटाची सावित्रीची पूजा करताना दिसत होत्या. विशेष म्हणजे आज सोमवती अमावस्या दुपारनंतर सुरू झाल्यानंतर राज्यातील पवित्र त्रिवेणी संगमावर पवित्र संगम स्नानासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पवित्र संगम स्नान झाल्यानंतर वटवृक्षाची पूजा महिला करताना दिसत होत्या. आपल्याकडे वटपौर्णिमेला तर येथे आज सोमवती अमावस्याला पूजा करताना महिला दिसत होत्या. या संदर्भात उपस्थित काही भाविक महिलांशी चर्चा केली असता उत्तर भारतात या दिवशीच दरवर्षी हि पूजा होते. सावित्री पूजा व्रत्त करून केली जाते .असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात मात्र पौर्णिमेला ही पूजा केली जाते. ही वटसावित्री पूजा पंधरा दिवसांनी दहा -अकरा जून 2025 ला वटपौर्णिमेला महाराष्ट्रात केली जाणार आहे. असे समजते.
0 Comments