टाकळीभान( प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ओन्ली साई क्रीडा मंडळाचा खेळाडू प्रो कबड्डी स्टार पुणेरी पलटण चा संघनायक असलम मुस्तफा इनामदार यांना महाराष्ट्र शासनाचा खेळातील सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.
असलम इनामदार हा ग्रामीण भागातील असून खेळाविषयीची जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जीवावर त्याने घेतलेल्या कष्टाने आज तो प्रो कबड्डी सारख्या खेळातील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाला आहे व भारतीय संघातील उत्कृष्ट खेळाडू म्हणून अभिमानाने असलम चे नाव घेतले जाते. या आधी कबड्डी खेळाडूची प्रशिक्षक प्राध्यापक सुनील जाधव सर व अप्पर पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा पंकज शिरसाट यांना महाराष्ट्र शासनाचा हा शिवछत्रपती पुरस्कार मिळालेला असून असलम हा अहिल्यानगर जिल्ह्यातील तिसरा खेळाडू ठरला आहे
असला इनामदार हा ग्रामीण भागातील खेळाडू असून असलम आठ वर्षाचा असताना वडिलांचे निधन झालं व आईने तीन भावंडे आणि दोन बहिणी यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च जुने भांडी व मोल मजुरी करून भागवला अशा परिस्थितीतून अस्लमचा मोठा भाऊ वसीम हा ही कबड्डी खेळाडू असून तो सध्या महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहे अशा नाजूक परिस्थितीत सुद्धा स्वतःचे शिक्षण करून खेळाचा ध्यास धरून अतोनात प्रयत्नात असलमने आपले स्वप्न साकार केले. त्याचे शिक्षण पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर पाचवी ते बारावी शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे झाले. असलम याने टाकळीभान बरोबरच आपल्या तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव देशपातळीवर कोरले आहे. येत्या 18 तारखेला होणाऱ्या पुरस्कारासाठी असलम इनामदार याची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्वोच्च पुरस्काराबद्दल असलम चे टाकळीभान व पंचक्रोशीतून अभिनंदन केले जात आहे नव्या पिढीला खेळा विषयीचा आदर्श म्हणून असलम इनामदार यांच्याकडे पाहिले जाईल असलम बरोबरच शिवम पटारे देखील प्रो कबड्डी चा सुपरस्टार खेळाडू बनला आहे या दोघांमुळे ग्रामीण भागातील कबड्डी खेळाडूंना सुद्धा चांगले दिवस येतील हे सिद्ध झाले आहे.
0 Comments