दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.27-साडे तीन लक्ष कर्जाचा बोजा डोक्यावर व उत्पन्न हाती आले नसल्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेत सोयगाव तालुक्यातील आमखेडा भागातील शेतकऱ्याने बुधवारी रात्री एक वाजेच्या सुमारास शेतातील विहिरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे महसूलने घटनेचा पंचनामा केला असून सोयगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे या घटनेमुळे सोयगाव शहरात खळबळ उडाली आहे .
गोपीनाथ वाळुबा मोरे (वय 42) असे विहिरीत उडी घेत आत्महत्या केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे त्याच्याकडे फरदापुर शिवारात गट क्र-190 तीन एकर शेती आहे खरीप हंगाम हातातून गेल्या नंतर रब्बीच्या हंगामात ही उत्पन्न हाती आले नाही त्यामुळे डोक्यावरील कर्जाचा बोजा फेडण्याच्या चिंतेत त्यांनी बुधवारी रात्री शेतातील विहिरीत उडी घेतली फरदापुर शिवारातील शेतीवर त्यांचेकडे बँक ऑफ महाराष्ट्र,विकास सोसायटी,बंधन बॅंक ,आय डी एफ सी बँक ,इंडोसन बँक या सर्व बँकांचे अंदाजे कर्ज तीन ते साडे तीन लाख रु कर्ज थकबाकी आहे उत्पन्न च हाती न आल्याने त्यांनी कर्जाची चिंतेत ही टोकाची भूमिका घेतली आहे सोयगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ दिनाजी खंदारे यांनी शवविच्छेदन केले गुरुवारी सायंकाळी पाच वाजता त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात आई ,पत्नी,दोन मूल, एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे.
चौकट;-सोयगाव तालुक्यात जानेवारी महिन्यापासून शेतकरी आत्महत्या चे प्रमाण वाढले असून जानेवारी ते मार्च पर्यंत सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे..
0 Comments