दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.28- आमरण उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांना दि.25 फेब्रुवारी रोजी सोयगाव तहसीलचे नायब तहसिलदार संभाजी देशमुख यांनी 30 दिवसात तक्रारी बाबत चौकशी करून कारवाई करण्यासंबंधी लेखी आश्वासन दिल्याने संदीप इंगळे यांनी उपोषण स्थगित केले होते.
दरम्यान 30 दिवसांचा कालावधी लोटला तरी देखील चौकशी करून कारवाई करण्यात आली नसल्याने दि.25 फेब्रुवारी रोजी स्थगित केलेले आमरण उपोषण दि.02 एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे लेखी निवेदन दि.21 मार्च रोजी तहसीलदार यांना देण्यात आले. अकार्यक्षम तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांच्या मनमानी कारभारामुळे उपोषणकर्त्यावर पुन्हा आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तहसीलदार यांच्या मनमानी कारभार करण्याकडे जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी सिल्लोड हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. जिल्हयाचे पालकमंत्री ना.संजय शिरसाट यांनी लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरीत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की तालुक्यात होत असलेली गौण खनिज चोरटी वाहतुकीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत आहे याकडे तहसीलदार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. चोरटी गौण खनिज वाहतुकीसह इतर अठरा तक्रारी तहसीलदार यांच्याकडे लेखी स्वरूपात करून देखील चौकशी करून कारवाई करण्यात आली नसल्याने सामजिक कार्यकर्ते संदीप इंगळे हे दि. 24 फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. दुसऱ्या दिवशी दि.25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी नायब तहसिलदार संभाजी देशमुख यांनी तक्रारी संबंधी 30 दिवसाच्या आत चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आमरण उपोषण स्थगित करण्यात आले होते. तहसीलदार यांच्याकडून कोणतीही चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे दि.25 फेब्रुवारी रोजी स्थगित केलेले आमरण उपोषण दि.02 एप्रिल रोजी तहसिल कार्यालयासमोर सामजिक कार्यकर्ते हे आमरण उपोषण करणार आहेत. तहसीलदार मनीषा मेने-जोगदंड यांच्या मनमानी कारभारामुळे तक्रारदार, उपोषणकर्ते यांना योग्य न्याय मिळत नसल्याने आर्थिक भुदंड सोसत संघर्ष करावा लागत आहे. तहसीलदार यांचा कार्यालयात येण्याचा व जाण्याचा वेळ हा त्यांच्या मर्जीनुसार ठरलेला असून याची मोठी किंमत शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना मोजावी लागत आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांचे ही सोयगाव कडे मोठे दुर्लक्ष झाले आहे. यायाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.संजय शिरसाट यांनी तरी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक व शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप शिंदे सोयगाव यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments