अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाची* अमलबजावणी करण्यासाठी मांगवीर महामोर्चा मध्ये सहभागी होणे हे प्रत्येक मातंगाचे कर्तव्यअध्यक्ष -अशोक लोखंडे आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे स्मारक समिती

(नंदकुमार बगाडे जिल्हा प्रतिनिधी)

        "अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण, बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारावर दलितांचे हक्क हिरावून घेणे त्याचबरोबर आर्टी, अण्णा भाऊ साठे महामंडळ यांचे सक्षमीकरण, अण्णा भाऊंना भारतरत्न आणि ॲट्रॉसिटी कायदा अधिक कठोर करणे... यासारख्या मातंग समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांची अमलबजावणी होण्यासाठी .

5 मार्च रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर जो *मांगवीर महामोर्चा* आयोजित करण्यात आला आहे, 
त्या मोर्चासाठी महाराष्ट्रातल्या तमाम समाज  बांधवांनी पाठिंबा देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि याच भावनेने या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे" असे आवाहन महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाला मी आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचा अध्यक्ष अशोक लोखंडे करीत आहे.

         प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे हे आपल्या समाजातील एक विचारवंत आहेत, नेते आहेत. अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना महाराष्ट्रभर ओळखले जाते. 

 संपूर्ण आयुष्य त्यांनी संघर्षामध्ये व  अन्यायी व्यवस्थेविरुद्ध लढण्यामध्ये खर्च केले आहे.

 त्याचबरोबर कॉ. गणपत भिसे  हे अनुसूचित जाती आरक्षण प्रश्नावर सातत्याने लढत आहेत. मातंग समाजाच्या विविध प्रश्नावर त्यांनीही अनेक आंदोलने केली आहेत. त्यामुळे डॉ. मच्छिंद्र सकटे आणि गणपत भिसे यांच्या पुढाकारातून आयोजित  करण्यात आलेला हा मांगवीर महामोर्चा हा या दोघांचाच नसून तो संपूर्ण समाजाचा आहे, या भावनेतून प्रत्येकाने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे असे मला वाटते. या मोर्चाला ज्या ज्या संघटनांनी आणि त्यांच्या नेत्यांनी सपोर्ट केलेला आहे त्या सर्वांचे मी व्यक्तिशः आभार मानतो.

आणि तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाने या महामोर्चा मध्ये सहभागी व्हावे आणि 5 तारखेला आझाद मैदानावर यावे असे मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करीत आहे.

*मा अशोक लोखंडे*
आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती, पुणे.

(सहयोगी बातमीदार नंदकुमार बगाडे जिल्हा प्रतिनिधी)

Post a Comment

0 Comments