शेरी अंगणवाडी क्र. ६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी.सर्वत्र कौतुकाचा वर्षाव


 
राहुरी ता.( प्रतिनिधी)

राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी येथील अंगणवाडी क्र. ६० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली असून यावेळी बाल गोपाल समवेत अंगणवाडी सेविका सौ.काकडे मंगल, मदतनीस सौ.बिस्मिल्ला शेख यांनी अंगणवाडी बालकांना शिव जयंती विशेष माहिती दिली.

यावेळी प्रमुख उपस्थिती काकडे एकनाथ, काकडे आप्पा साहेब, काकडे पोपट, काकडे भीमराज, सुलोचना काकडे, आणि बाल गोपाळ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
   छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान आणि आदर्श राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६ रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्यावर झाला, आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी भोसले हे होते.
  शिवरायांचे बालपण खूप धामधूमीत गेले असून त्यांनी वयाच्या १२ १६८० वर्षापर्यंत आई जिजाऊच्या देखरेखेखाली व शहाजी राजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकाकडून अनेक कला, विद्या,भाषा अवगत केल्या.
    छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे ४०० वर्ष महाराष्ट्र राज्यात स्वराज नव्हते.महाराष्ट्राचा बहुतांश भाग अहिल्यानगरचा निजामशाह व विजापूरचा आदिलशाह यांच्या सत्तेत होता, याविरुद्ध लढण्यासाठी व जनतेला कायमचे सुखी करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे पवित्र कार्य हाती घेतले.
          वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले.शिवराय जरी वयानी लहान असले तरी मनाची भरारी प्रचंड मोठी होती, त्यांनी महाराष्ट्रात जीवास जीव देणारे मावळे निर्माण केले.शिवरायांनी विजापूरच्या दरबारातील भारी सरदार अफजल खानास शक्ती पेक्षा युक्तीने धुळीस मिळवले, त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रत्येक प्रसंग महाराष्ट्रास प्रेरणा देतो.
    शिवाजी महाराजांनी गमिनी कावा या तंत्रचा अवलंब करून अनेक गड किल्ले जिंकले.तंत्राचा वापर करताना त्यांना सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले,प्रजेचा पूर्ण पाठिंबा मिळाला.महाराजांनी वनदुर्ग,गिरीदुर्ग, आणि जलदुर्ग हे तीन प्रकारचे किल्ले बांधून लोकांमध्ये देश प्रेम व आत्म विश्वास निर्माण केला. शिवरायांनी इंग्रज, सिद्दी व पोर्तुगीज यांना दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले. शिवाजी महाराजांना भारतीय आरामाराचे जनक म्हटले जाते, त्यांनी आपल्या स्वराज्यात कधीही कोणताही भेदभाव केला नाही.
           संतांचा, विद्वानांचा सत्कार केला. मंदिर व मशीदीचे रक्षण केले. पर्यावरण संरक्षणा ला प्राधान्य दिले. लहान, थोरांचा आदर करत स्रियांचा सन्मान केला.
       आदर्श पुत्र, कुशल संघटक, रयतेचा वाली, दुर्जनांचा कर्दनकाळ व सज्जनांचा कैवारी, थोर राष्ट्रपुरुष ३ एप्रिल १६८० रोजी जनतेला दुःख सागरात लोटून अनंतात विलीन झाला.

Post a Comment

0 Comments