शिर्डी ( प्रतिनिधी )
राहाता तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर बु विद्यालयामध्ये विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. दिनांक २८ फेब्रुवारी रोजी सर सी.व्ही. रमन यांनी १९२८ मध्ये 'रामन इफेक्ट' शोध लावला होता. या शोधाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन मोठया उत्साहात साजरा केला जातो.
यावेळी विद्यालयातील इ ९ वी ची विद्यार्थीनी कु.अनुष्का पवार हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच इ ९ वी च्या वर्गातील विद्यार्थिनींनी अंधश्रद्धेवर आधारीत नाटिका सादर केली, यावेळी स्वराज कापसे, कु.अमृता डोखे, कु.अरशिन शाह आणि कु.नेहा वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयातील जेष्ठ शिक्षक आदरणीय श्री. डुंबरे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मानवाच्या गरजा आणि दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व सांगून सर्वांना विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री. तुपे एस. एम. सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. डुंबरे आर.ए., सौ.डहाळे पी.डी., श्री. म्हस्के ए.जे, श्री. काळेगोरे एम.बी, श्री. खान आय. आय., सौ. भामरे एम.आर., श्री. वाकचौरे ए.ए., आदी शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
0 Comments