दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि. 22 - जारूळ वृक्षाचे फुलं हें महाराष्ट्राचे राज्य पुष्प व हरीत मान चिन्ह आहे. या जैवविविधतेच्या दृष्टीने उपयोगी वृक्षाच्या रोपणाचा ध्यास घेतलेले सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक डॉ. संतोष पाटील यांच्या आवाहणास व कार्यास प्रतिसाद म्हणून सिल्लोड येथील उपक्रमशील व नामांकित "इरा इंटरनॅशनल स्कुल" या शाळेने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मिरवणुकीत जारूळ पुष्पा बद्दल जनतेत जागृती व्हावी, रोपणास कल वाढावा म्हणून" सन्मान महाराष्ट्राचा " हें पोष्टर मिरवणुकीत अग्रस्थानी ठेवून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. राज्यात प्रथमच असा उपक्रम राबविला गेला.
शाळेचे अध्यक्ष सिद्धेश्वर आहेर यांनी या झाडाची माहितीही माईक वरून सांगितली.राज्यातील पर्यावरण प्रेमिंनी याचे कौतुक केले आहे.जारूळ वृक्षाचे लाकूड वजनाने हलके, चिवट व समुद्राच्या पाण्याचा त्यावर विपरीत परिणाम होत नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे जगातील पहिले आरामार उभारण्यास म्हणजे , होड्या, नाव, तराफे बनवण्यास या सारख्या झाडांचा उपयोग केला. या झाडाचे आज इरा इंटर नॅशनल शाळेत डॉ. पाटील, सिद्धेश्वर आहेर, गजानन गव्हाणे आदींच्या हस्ते रोपण करण्यात आले.
0 Comments