थंडीमुळे वाढले सांध्याचे जुनाट आजार!



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.21-  हिवाळ्यातील बोचरी आणि गुलाबी थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. मात्र, हीच थंडी सांध्यांचे आजार असलेल्यांसाठी त्रासदायक ठरते.


 थंडीत सांध्यांचे जुनाट आजार डोकेवर काढत असल्याने प्रत्येकाने हाडांचे आरोग्य जपावे, असा सल्ला तालुका आरोग्य अधिकारी डॉ गितेश चावडा यांनी दिला.
आहारात पोषक तत्त्वांचा अभाव, बदलती जीवनशैली, एकाच सांध्यावर नियमितपणे भार पडत राहणे, मोबाइल व संगणकावर तासनतास चिटकून राहणे, हाडांचे फॅक्चर झाल्याने किंवा सांध्याच्या ठिकाणी आघात झाल्याने, अनुवंशिकता, आहारात कॅल्शियमची कमी या
कारणांमुळे सांधेदुखीचा त्रास बळावतो, असे अस्थिरोग तज्ज्ञ सांगतात. 




हाडे-सांधेदुखीने वयाची बंधने तोडली असून, 30 वर्षाच्या वयातही हा त्रास होत आहे. कमी वयातही अनेकांना हाडे-सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले. सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी थंडीत सांध्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. सांधेदुखी टाळण्यासाठी थंडीच्या दिवसांत अतिश्रमाची कामे करणे टाळावे, तसेच झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात ठेवावे, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.


---काय काळजी घ्यावी?
१)सांध्यांना थंड हवा लागू देऊ नये त्याचप्रमाणे पायांना, हातांना मोजे वापरावेत.
२)थंड पाण्यात काम करणे टाळावे. शिळे आणि थंड अन्न घेऊ नये.
३)कोमट पाणी पिणे, ताजा व गरम आहार घ्यावा.
४)हिवाळ्यात हलका व्यायाम करावा. यामुळे आपल्या शिरा मोकळ्या होतात.
५)नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्यावी.

Post a Comment

0 Comments