राहुरी / प्रतिनिधी : तालुक्यातील चिंचोली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात विविध भाजीपाला, फळे, बरोबरच खाद्यपदार्थांची रेलचेल दिसली. चिमुकल्यांबरोबरच पालकांनीही मनसोक्त आनंद लुटला.
शुक्रवारी चिंचोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच सौ. शोभाताई रावसाहेब लाटे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध भाज्या व वेगवेगळ्या चविष्ट खाद्यपदार्थांची मेजवानीच सर्वांसाठी उपलब्ध करून दिली होती. याचा चिमुकल्यांबरोबरच पालक व ग्रामस्थांनीही मनसोक्त आनंद लुटत आयोजकांचे कौतुक केले.
प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ.शारदाताई सोनवणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.अनिता भोसले, माजी अध्यक्षा सौ.सविता राऊत, सौ.अश्विनी सोनवणे, सौ.सपना भोसले, सौ.प्रियांका डुकरे, सौ.कल्पना ठोंबरे, सौ.रुपाली ठोंबरे, सौ.स्वाती राजभोज, सौ.सोनल निकम, सौ.उत्कर्षा सोनवणे, अर्चना भोसले, सौ.लता शेलार व इतर अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सदर उपक्रमाचे आयोजन व नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रतिभा बोबे व शिक्षिका अनुराधा भिंगारदिवे यांनी केले होते.
0 Comments