सावळीविहीर बु. जि.प.केंद्र शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांची नाशिक ,त्र्यंबकेश्वर, सहल उत्साहात संपन्न!

शिर्डी ( प्रतिनिधी)राहाता तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेची सहल सिन्नर, नाशिक दर्शन, पंचवटी ,काळाराम मंदिर, तारांगण ,अंजनेरी ,त्र्यंबकेश्वर, बुद्ध विहार ,दादासाहेब फाळके स्मारक ,या ठिकाणी नुकतीच सहल गेली होती. या सहलीमध्ये एकूण 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच सहा शिक्षक सहभागी झाले होते. 


दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सहल जाणार अशी चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चा होती. एक एक दिवस जात होता. सहलीसाठी लागणारे सर्व शैक्षणिक सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर शनिवारी सहलीचे सर्व तयारीनिशी आयोजन करण्यात आले. पालकही आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना घेऊन पहाटे जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आले. ड्रायव्हर मामाही कोपरगाव आगारातून एसटी महामंडळाची बस घेऊन शाळेच्या पटांगणा जवळ बाजारतळात उभी केली. बस समोर दिसल्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आनंद मोठा गगनात मावेनासा झाला. विद्यार्थ्यांनी एक एक सामान, पिशव्या बसमध्ये ठेवल्या. व सर्व विद्यार्थी बसमध्ये बसल्यानंतर विद्यार्थ्यांची हजेरी झाली.या सहलीच्या बस चे सागर जपे, पत्रकार राजेंद्र गडकरी, पप्पू वाघमारे, भास्कर वाघमारे, दयानंद बोर्डे, मुख्याध्यापक नानासाहेब मेहेत्रे, दत्ता गायकवाड, रूपाली मंड्रे, श्रीमती विद्या गोर्डे, श्रीमती सुचित्रा चवाळे, श्रीमती प्रियंका जाधव, श्री सिताराम गुरसळ यांचेसह पालकांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. व श्री साईबाबांचा जय जय कार करत व पालकांना हात घालून बाय बाय करत या सहलीचे सिन्नर कडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. सहलीच्या प्रवासात गाणी गप्पा, नृत्य गाण्याच्या भेंड्या आदीचा आनंद चिमुकल्या विद्यार्थ्यांनी घेतला. या चिमुकल्यांच्या आनंदात शिक्षकही रममान झाले होते.अशा या
सहलीतून दरवर्षी  भौगोलिक ज्ञान ,सामान्य-ज्ञान, धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना देखील भेटी देण्यात आल्या. त्यामध्ये पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन जर आपण अध्यापन केले तर ते अतिशय प्रभावी होते हे या सहली मागचा उद्देश आहे. या सहलीसाठी गावातील सर्व दानशूर पदाधिकारी आणि पालक यांनी मुलांना भरभरून खाऊ दिला .त्यामध्ये सावळविहीर बुद्रुक गावचे सरपंच ओमेश  जपे यांनी सर्व मुलांना जेवण दिले. त्याचप्रमाणे श्री गुरसळ सर ,श्री गणेश आगलावे, श्री विकास जपे , सागर आरणे, सतीश वाघमारे , अविनाश वाघमारे, शिवाजी झिंजुर्डे , सागर जपे, गोरक्षनाथ लिपने, शरद पवार या सर्व ग्रामस्थांनी देखील मुलांना अतिशय चांगल्या प्रकारे खाऊचे वाटप केले. यामध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान मिळाले पाहिजे आणि जास्तीत जास्त ठिकाणांना भेटी देता आले पाहिजे. यासाठी शाळेतील  मुख्याध्यापक श्री नानासाहेब मेहत्रे, श्री दत्ता गायकवाड,  रूपाली मंड्रे ,श्रीमती विद्या गोर्डे, श्रीमती सुचित्रा चवाळे, श्रीमती प्रियंका जाधव, श्री सिताराम गुरसळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सहलीत प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांनी गाणी गोष्टी गप्पा शब्दकोडी अशा प्रकारे विविध उपक्रम राबवून प्रवास आनंदी केला प्रवासामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला कोणताही त्रास झाला नाही.
 दरवर्षी सावळविहीर बुद्रुक केंद्र शाळेची सहल विविध ठिकाणी आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे क्षेत्रभेटी ,विविध शालेय स्पर्धा ,प्रदर्शन विमानतळांना भेटी, विविध लघुउद्योग ,कारागिरांना भेटी, देऊन त्यांच्या मुलाखती घेणे, वार्षिक स्नेहसंमेलन,या मार्फत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले जातात. या शाळेचा नावलौकिक तालुक्याबरोबरच जिल्ह्यात देखील झालाआहे. आपली सावळविहीर  बुद्रुक केंद्र शाळा ही सीसीटीव्हींनी युक्त असून सुरक्षित शाळा पालकांच्या दृष्टीने बनलि आहे. त्यामुळे या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांची नेहमीच आघाडी असते .शाळेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अध्यापन केले जाते. शालेय परिसर सुसज्ज आणि अतिशय उत्कृष्ट आहे. शाळेची सहल अतिशय उत्कृष्ट रित्या पार पाडल्याबद्दल सर्व ग्रामस्थांकडून शाळेचे आणि शिक्षकांचे कौतुक होत आहे त्याचप्रमाणे ही सहल यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख सोमनाथ जावळे त्याचप्रमाणे पालक राजेंद्र वाघमारे ,श्रीगादी साहेब, ड्रायव्हर श्री व्ही पी शेकडे यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments