लोहगाव( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य शरीर सौष्ठव फेडरेशनच्या मान्यतेने
युवा फ्रेंड्स ग्रुप जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये संतोष निवृत्ती कोटमे यांनी तृतीय क्रमांक मिळवला असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या जिल्हा शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. परंतु संतोष निवृत्ती कोटमे यांनी आपली उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे त्यांचा तृतीय क्रमांक आला असून त्यांना नुकतेच पारितोषिकही देण्यात आले आहे. संतोष निवृत्ती कोटमे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
शरीर सौष्ठव हा एक क्रीडा प्रकार आहे .याला इंग्रजीमध्ये बॉडीबिल्डींग अथवा शरीर बांधणी असे म्हणतात. यात मुख्यत्वे शरीराला व्यायाम देउन शरीराच्या स्नायूंना बळकट केले जाते. स्नायूंचा आकार व त्यांची सुडौलता, प्रमाणबद्धता व त्याचे सादरीकरण हे या क्रीडाप्रकारात महत्त्वाचे असते. असे चांगले शारीरिक सादरीकरण केल्यामुळे संतोष कोटमे यांना तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
0 Comments