ख्रिस्ताने आपल्या कार्यातून व आचरणातून माणुसकीला जन्म दिला



तालुक्यातील सर्व पंथीय चर्चेस मध्ये नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा

लोहगाव ( वार्ताहर)

 ख्रिस्ताचा जन्म संपूर्ण मानव जातीमध्ये शांती व मानवाचे तारण करण्यासाठी झाला असून ख्रिस्ताने आपल्या कार्यातून व आचरणातून माणुसकीला जन्म दिला असल्याचे प्रतिपादन सेंट मेरी धर्मग्राम प्रमुख फा. ज्यो. गायकवाड यांनी केले ख्रिस्त जयंती निमित्त भाविकांना विशेष संदेश देताना ते बोलत होते.

फा. ज्यो. गायकवाड म्हणाले की, नाताळ सण हा समजून घेतला तर जीवनात कोणत्याच वाईट प्रथांचे अतिक्रमण होणार नाही शांतीचा संदेश देणाऱ्या ख्रिस्त जन्मदिनी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

याप्रसंगी फा. जयसिंग, ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य फा. फ्रान्सिस पटेकर, फा. प्रशांत शहाराव, संत इग्नाथी चर्चचे धर्मगुरू फा. नेल्सन परेरा, मेथॉडिस्ट चर्चचे जॉर्ज चोपडे, बेथेल वर्शिप सेंटरचे पास्टर शिवाजी लांडगे बिलिव्हर्स चर्चचे पास्टर ग्रेगरी केदारी, दीपक शेळके, अमोल साळवे, बापू शेळके, विजय धारोळे, मच्छिंद्र जगताप आदींनी आपापल्या चर्चेस मधून धार्मिक एकोपा, राष्ट्रीय परिस्थितीमध्ये स्थिरता यावी म्हणून ख्रिस्त जयंती निमित्ताने आपल्या माणुसकीचा वर्षाव सत्कृत्याद्वारे गरीब दुबळे व गरजवंतांसाठी व्हावा हा महत्त्वाचा संदेश दिला. धार्मिक विधी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्त जयंती सोहळा तालुक्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिस्ती बांधवांबरोबरच माझी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीरजी तांबे, मा. नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, आ. सत्यजित तांबे, आ. अमोल खताळ आदींनी चर्चेस मध्ये भेट देऊन समस्त ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कैलास भोसले, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, अँड. विजयानंद पगारे, सुखदेव शेळके, लॉरेन्स गायकवाड, लाजरास केदारी, सिमोन रूपटक्के, आर.ई. गायकवाड, सनी गायकवाड, अजित पाटोळे, अरविंद सांगळे, अनुप कदम, सचिन सोनवणे ,अँड. रवी शेळके, प्रवीण रोहम, प्रभाकर चांदेकर, रमेश ओहोळ, रमेश कोळगे, विनोद गायकवाड, अॅड. किरण रोहम आदींसह खिस्ती बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments