श्री क्षेत्र वाकडी येथे श्री खंडोबा देवस्थानची सात ‌व आठ डिसेंबर रोजी भव्य यात्रा!

राहाता (प्रतिनिधी)
 अहमदनगर जिल्ह्यातील प्रतिजेजुरी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या राहाता तालुक्यातील खंडोबाची वाकडी येथील खंडोबा देवस्थानचे चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरत आहे.  वाकडी येथील खंडोबा मंदिरात चंपाषष्टी निमित्त शनिवार दि 7 डिसेंबर ते रविवार दि 8 डिसेंबर रोजी दोन दिवस भव्य यात्रा उत्सव आयोजित केला असल्याची माहिती खंडेराय देवस्थान ट्रस्ट कडून देण्यात आली आहे.
या चंपाषष्टी यात्रा उत्सव दरम्यान खंडोबा देवाला खोबरे भंडारा बरोबर कांदे व वांगे नैवेद्य वाहण्याची जुनी प्रथा असल्यामुळे लाखो भाविक या यात्रेत कांदे वांगे वाहून रोडगा भरीत देवाला नैवेद्य वाहतात.त्याचप्रमाणे वाकडी पंचक्रोशीतील बहुतेक मल्हारी भक्त यात्रेच्या अगोदर कांदे व वांगेचे सेवन न करता उपवास धरून यात्रेच्या दिवशी देवाला कांदे वांगे वाहून उपवास सोडून मग कांदे वांगेचे आहारात सेवन करतात ही जुनी प्रथा असून त्यामागे मोठी अख्यायिका आहे.
 यात्रेच्या आदल्या दिवशी नेहमीप्रमाणे खंडोबा मंदिर ते हनुमान मंदिर दरम्यान देवाची काठी मिरवनुक व देवाचा छबीना कार्यक्रम आयोजित केला आहे. यात्रेच्या दिवशी पहाटे मल्हारी भक्तांनी आणलेल्या गंगेच्या पाण्याने देवाला स्नान घालून खंडेरायाची महापूजा आरती होऊन यात्रेस सुरुवात होणार आहे, वाकड़ी येथिल खंडेरायाच्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची दर्शनाची सोय व्हावी यासाठी देवस्थान ट्रस्ट कडून सुसज्ज दर्शन रांगेची सुविधा तसेच पिण्याचे पाणी,आरोग्य व्यवस्था,पार्किंग सुविधा आदीची व्यवस्था करण्यात येणार आहे. वाकडी पंचक्रोशित खंडोबा महाराज यात्रेत होणाऱ्या उच्चांकी गर्दी बाबत राहाता,श्रीरामपूर ग्रामीण पोलीस स्टेशन कडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यात्रेच्या पहिल्या दिवशी दुपारी चार वाजता संपूर्ण गावातून खंडोबा महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक होणार आहे.यात्रेनिमित्त मंदिर परिसरात.
 साफसफाई,पिण्याचे पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच विद्युत रोशनाई खंडेराय देवस्थान ट्रस्ट कडून सुरु आहे. वाकडी येथील खंडोबा मंदिर कळस, मंदिराचा गाभारा,भक्त निवास यासह महत्वाच्या ठिकाणी उत्कृष्ठ रंग काम,मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक देखील पूर्ण झाले आहे.या यात्रेतील होणारी गर्दी पाहता खंडोबा मंदिर परिसरात व यात्रा परिसरात महत्वाच्या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे. मंदिर परिसरात शुशोभीकरण व इतर तीर्थक्षेत्र विकास कामे सुरु आहेत.तरी वाकड़ी येथिल खंडोबा महाराज यात्रेचा पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन श्री खंडेराय देवस्थान ट्रस्ट,यात्रा कमिटी, वाकडी ग्रामपंचायत व वाकडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments