टाकळीभान प्रतिनिधी - टाकळीभान येथील पुरातन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात देवस्थान ट्रस्ट व तिळवन समाज बांधव यांचे वतीने श्री.संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
मंदिरात असलेल्या श्री. संताजी महाराज जगनाडे यांच्या मूर्तीस स्वप्नील व रेश्मा शिंदे यांच्या हस्ते गंगाजलाने स्नान, अभिषेक, विधीवत पूजा व आरती करण्यात आली. पुजेचे पौरोहित्य संजय देवळालकर गुरू यांनी केले. आरती नंतर सर्व उपस्थित भाविक व ग्रामस्थांना प्रसाद देण्यात आला.
यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव नानासाहेब लेलकर, विश्वस्त लक्ष्मण भालसिंग तसेच रमेश नागले, खुशाल नागले,सोमनाथ शिंदे, राजेन्द्र शिंदे, दिलीप नागले,यामाजी नागले, सचिन शेजुळ, रामा शिंदे, राहुल नागले, सचिन नागले, चौधरी, शांतीलाल धोंडलकर, लता नागले, रोहिणी नागले, जया नागले, सुनीता शिंदे, राणी नागले, आरती शेजुळ आदी उपस्थित होते.
0 Comments