सबुरी का फल मीठा होता है!श्रद्धा व सबुरी मुळेच मिळाले मंत्रिपद ! दरवर्षी थर्टी फर्स्टला सहकुटुंब येतो साईचरणी! सर्वांच्या समस्या, अडचणी दूर व्हाव्यात ही केली साईना प्रार्थना----रोजगार हमी फलोद्यान मंत्री ना.भरत गोगावले

शिर्डी (प्रतिनिधी) दरवर्षी आमचा थर्टी फर्स्ट हा साईचरणी असतो. सहकुटुंब आम्ही शिर्डीला येऊन साईबाबांचे दर्शन घेतो. असे सांगत श्रद्धा सबुरी असली तर कुठेही अडचण येत नाही. निश्चितच श्रद्धा सबुरीनेच मंत्रीपद मिळाल्याचे सांगत सबुरी का फल मीठा होता है, असे मत राज्याचे रोजगार हमी ,फलोद्यान, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्याचे  रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री यांनी रविवारी सहकुटुंब शिर्डीला भेट देऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) उपस्थित होते. 
साई दर्शनानंतर नामदार भरत गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, थर्टी फर्स्टला प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो .मात्र गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही सहकुटुंब शिर्डीला साई चरणी येत असतो. यावेळी वेगळा आनंद आहे. कारण 15 वर्ष मी आमदार म्हणून शिर्डीला येत होतो .मात्र या सोळाव्या वर्षी मंत्री म्हणून साई दर्शनाला आलो आहे. ही आमची वारी आहे. सबुरी का फल मीठा होता है, मागील वेळी मंत्रिमंडळाच्या व आमचे नेते एकनाथराव शिंदे यांच्या अडचणी समजून घेतल्या. व मी शांत राहिलो. मात्र त्याचं फळ आता मिळालं आहे. श्रद्धा सबुरी राखल्यानेच शिंदे साहेबांनी पहिल्या यादीत मंत्री मला केले आहे . व मागील घट भरून काढली आहे.असे सांगत शिर्डी वरून शनिशिंगणापूरला, तसेच मध्ये श्री गणपतीचे दर्शन घेऊन एक तारखेला  श्री महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहे. सर्व देवतांना हे वर्ष चांगले जाऊ दे, तसेच गोरगरिबांच्या अडचणी, समस्या दूर होऊ दे! अशी आपण प्रार्थना करत आहे. असे सांगत बीडच्या घटनेबाबत ते म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शासन व्हायला पाहिजे. कालचा बीडचा मोर्चा मोठा होता. उद्रेक झाला की लोक बाहेर निघतात.  दोषी कुणीही असो त्याला शासन व्हायला पाहिजे. हे झाले नाही तर महायुतीवर ठपका येऊ शकेल .असेही त्यांनी सांगत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटने संदर्भात सभागृहात माहिती दिली आहे. या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याला सोडणार नाही ,हा त्यांचा शब्द ते पूर्ण करतील ,असा विश्वास व्यक्त करत आरोपी कुठेही फरार असले तरी महाराष्ट्राची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्राचे पोलीस  आरोपी पातळात गेले तरी शोधून काढतीलच. असे त्यांनी ठामपणे सांगितले. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, आमदार सुरेश धस प्राजक्ता माळी यांच्या बद्दल जे काही बोलले त्याबद्दल मला अधिक कल्पना नाही. मात्र आमदार धस यांचे विश्व वेगळे व प्राजक्ता माळी यांचे विश्व वेगळे आहे .तरीही आमदार धस यांना खरं काय प्रकरण आहे. याबद्दल फोन करून विचारणार आहे. असे सांगत नामदार भरत गोगावले यावेळी पुढे म्हणाले की, संजय राऊत जे बोलतात त्यांच्या विरोधात सर्व घडत असते. ते मागील अडीच वर्षात वारंवार म्हणायचे सरकार पडेल, मात्र अडीच वर्ष सरकार टिकले व भक्कम होत गेले. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी ही पाच वर्ष ठाम राहतील .हे साई चरणी मी सांगत आहे .असेही भरत गोगावले यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments