लोहगाव (वार्ताहार ) अहिल्यानगर मनमाड या महामार्गावर लोहगाव शिवारामध्ये हॉटेल अजित जवळ एका वस्तीवर थेट भरधाव वेगाने कंटेनर हा रस्ता सोडून नारळाचे झाडे तोडून, ट्रॅक्टर धडकून ,थेट भिंत पाडून घरात घुसला . मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही. मात्र हा अपघात दिवसा झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. हा जबरी अपघात झाल्यामुळे सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे. खराब रस्त्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
अहिल्यानगर ते कोपरगाव या रोडवरील अपघाताची मालिका थांबेना. या रोडवर आतापर्यंत बरेचसे अपघात झाली की, अनेकांचे पाय गेले, हात गेले कित्येक जायबंदी झाले तर काही मृत्यूमुखी पडले याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्या नगर कडून कडून शिर्डी कडे जाणाऱ्या लक्झरी बस क्रमांक MH18B.G9300 व मनमाड कडून अहिल्यानगर कडे जाणारा कंटेनर क्रमांक GJ06B.T8334
लोहगाव शिवारात हॉटेल अजित जवळ बबन हौशीराम चेचरे यांच्या बंगल्यात रात्री १.४० मिनिटे घुसला. लक्झरी बस व कंटेनर समोरासमोर धडक झाल्याने कंटेनरचा वेग इतका जोरात होता की त्यांने बंगल्या समोरील तारकंपाऊंड, नारळाचे एक झाड. मूळासकट उन-मळून पडले तर दुसरे झाड भुई सपाट झाले. घराशेजारी लावलेला ट्रॅक्टर देखील या कंटेनर ने दाबला. त्यामुळे ट्रॅक्टरची पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.जर नारळाचे झाड तार कंपाऊंड मुळा सगट उपटून पडले असेल तर त्या गाडीचा वेग किती असू शकतो.
याचा अंदाज सर्वसामान्य पडलेला आहे व समोर असणारा त्यांच्या ट्रॅक्टर दाबून कंटेनर डायरेक्ट भीतीला आदळला व भिंत तुटून त्या खाली पडल्या .ज्या घरात विटा पडल्या होत्या त्या घरात चेचरे कुटुंब काही सदस्य झोपलेले होते. एक इट त्यांच्या घरातील व्यक्तींना घासून गेल्यामुळे बोटाला मोठ्या प्रमाणात इजा झाली. व त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या घरातील कोणालाही मोठ्या प्रमाणात दुखापत झाली नाही. हा अपघात जर पाठीमागे पाचशे फुटावर जर झाला असता तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. प्रथम दर्शनी तिथे लोकांनी पाहिले असता लक्झरी बस वाल्याचीच या ठिकाणी चूक आढळून येते कारण की तो त्याची साईट सोडून रॉंग साईडने घुसल्यामुळे समोरून येणारा कंटेनर व त्यांच्यात अपघात होऊन कंटेनर डायरेक्ट चेचरे यांचे कंपाउंड तोडून घरात घुसला व त्यांच्या घराची मोठ्या प्रमाणात तोडमोड झाली. स्लॅबला क्रॅक पडले आहे .मोठ्या प्रमाणात आवाज झाल्यामुळे घरातील सदस्य उठले त्यांनी बघितले तर कंटेनर डायरेक्ट आपल्या घरात घुसला त्यांनी लगेचच परिसरातील नागरिकांना फोन करून या गोष्टीची कल्पना दिली व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील लोक जमा झाले तेवढ्या रात्रीस त्यांनी कंटेनरचा ड्रायव्हर आत गुंतलेला होता. त्याला बाहेर काढून दवाखान्यात नेले हाच अपघात जर दिवसा झाला असता तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाली असती. या अपघाताची खबर स्थानिक पोलीस स्टेशनला दिली असता पोलिसांनी रात्री सदर घटनेची पाहणी केली. हा अपघात झाल्यानंतर परिसरातील रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे व नगर मनमाड रोड हा सातत्याने वाहत असल्यामुळे जाणाऱ्या प्रवाशी देखील थांबून हा अपघात
(अपघात राहाता तालुक्यातील लोहगाव शिवारात घडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमा झाली होती)
बघत आहे. त्यामुळे या रस्त्याचे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे.अहिल्यानगर ते कोपरगाव रोडचे काम बऱ्याच वर्षापासून चालू आहे .काही ठिकाणी एकतर्फी होणारे वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांची कोंडी होती.
या रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होईल. याचा अंदाज कोणीही देऊ शकत नाही. कारण की या ठिकाणी बरेचसे कॉन्ट्रॅक्टर आले व अर्धवट काम सोडून निघून गेले त्यामुळे हा रस्ता भविष्यात लवकर पूर्ण होईल की नाही हे सांगणं आता कठीण झाले आहे.
मात्र या खराब रस्त्यामुळे अनेक अपघात होऊन अनेक जण अपंग होत आहेत. अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा महामार्ग बनवण्यात यावा .अशी मागणी आता परत एकदा वाहनधारक, ग्रामस्थ यांच्याकडून जोर धरू लागली आहे. या अपघातात संदर्भात पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
0 Comments