शिर्डी ( प्रतिनिधी) अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की,
सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका, किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशामुळे शनिवार 21 डिसेंबर 2024 पासून जिल्ह्यामध्ये शस्त्रबंदी व जमाबंदी आदेश लागू होणार आहे.
डिसेंबर महिन्यामध्ये नाताळ, थर्टी फर्स्ट, वर्षाला निरोप, तसेच एक जानेवारीला नवीन वर्षाचे स्वागत , आदीं मुळे जिल्ह्यामध्ये कुठेही अनुचित प्रकार होऊ नये. कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावी. यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे. असे समजते.
0 Comments