टाकळीभान( प्रतिनिधी )
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिस्थिती हालाखीची असल्याने, व स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन, तासिकेसाठी मोठी खर्चिक बाब असल्याने ग्रामीण भागातील भागातील विद्यार्थी मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेसाठी जाऊ शकत नाही, त्यामुळे श्रीरामपूर सारख्या ठिकाणी उम्मती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल भैया दारूवाला यांच्या हस्ते येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी सोहेल भैया दारूवाले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व्हावे व शहराप्रमाणे ग्रामीण भागामध्ये स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाची सोय व्हावी या उद्देशाने येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासिका केंद्र स्थापन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांमध्ये जाऊन अभ्यास करणे खर्चिक बाब असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कष्ट घेण्याची तयारी व चिकाटी असून देखील ते मागे राहतात, त्यामुळे या ठिकाणी अभ्यासिका केंद्र सुरू केले आहे,rash तरी या अभ्यासिका केंद्राचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी एन आय सी क्रीडा प्रशिक्षक सौरभ कदम, ओम समोस्याचे मालक रोहित पवार , क्रीडा प्रशिक्षक शुभम जाधव, आकाश शिरसाठ, हांडे सर,महेश कांबळे, इम्रान मलिक, अश्फाक शेख, होंडे सर, असलम शेख, कबड्डीपटू देवा जगताप, सचिन कांबळे आदी उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. यावेळी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते,
0 Comments