महायुतीला राज्यासह शिर्डीत चांगले वातावरण! राज्यात सर्वाधिक मताधिक्याने ना. विखे यांना विजयी करावे -----आंध्र प्रदेशचे भाजपा अनुसूचित जाती -जनजाती मोर्च्याचे अध्यक्ष व महाराष्ट्र नॉर्थ प्रदेशचे निरीक्षक --देवानंदजी

शिर्डी (प्रतिनिधी) केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यात विविध विकास कामे व योजना अंमलात आल्यामुळेचमहाराष्ट्रात सर्वत्र महायुतीला चांगले वातावरण असून शिर्डी मतदारसंघातही राधाकृष्ण विखे पाटील यांचे सर्वोत्कृष्ट असे काम आहे. आपण मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतींना  भेटी देत आहोत .विखे पाटलांची लोकप्रियता मोठी आहे. त्यांना यावेळी मोठ्या मताधिक्याने विजय करण्याचे आवाहन आंध्र प्रदेश राज्याचे अनुसूचित जाती जनजाती मोर्चाचे अध्यक्ष व भाजपाचे नॉर्थ महाराष्ट्र निरीक्षक कडूस देवानंदजी यांनी केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री हनुमान मंदिरात अनुसूचित जन-जाती व मतदारांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत राहता पंचायत समितीचे माजी सभापती श्रीनिवास त्रिभुवन हे होते.
श्री देवानंदजी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आपण पक्षाचे निरीक्षक म्हणून नागपूर, नाशिक, पुणे अहिल्यानगर आदी जिल्ह्यात फिरलो. सर्वत्र महायुतीचे वातावरण आहे. शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या .येथे पाणी, आरोग्य, घरकुले आदी सह अनेक छोट्या मोठ्या योजना घराघरात, प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवल्या. अनुसूचित जाती जमाती तसेच ओबीसी आणि सर्वसामान्य नागरिक ,महिला, युवक यांच्यासाठी विविध योजना राबवून विकास कामे केली. त्यामुळेच प्रत्येक गावात विखे पाटलांची लोकप्रियता मोठी असल्याचे दिसून येते. अनेक ठिकाणी फिरलो. मात्र असा लीडर मला पाहायला मिळाला नाही. त्यांचे चिरंजीव सुजय दादा विखे पाटीलही अगदी साधीसुधी राहणीमान, साधेसुधे बोलणे, मलाही मोठे आश्चर्य वाटले. आमच्या आंध्रमध्ये गावचा पुढारी सुद्धा मोठा हाय फाय राहतो. मात्र सुजय दादा यांची साध्या पद्धतीची राहणीमान मलाही त्यांच्याशी भेट झाल्यानंतर भावून  गेली. असे सांगत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत आहेत. भाजपाने दिलेले शब्द पाळले. भाजपात साधासुधा निष्ठावान कार्यकर्ता, नेता असला तरी तो मोठा होतो. त्यामुळेच अब्दुल कलाम, रामनाथ कोविंद, व द्रौपदी मुर्मु जी  हे राष्ट्रपती झाले .अनेक  अनुसूचित जाती जमाती ओबीसींनाही भाजपाने चांगली, मोठी संधी दिली. तसेच देशात सर्वांना फ्री रेशन मिळत आहे. काश्मीर मध्ये आता 370 कलम रद्द केल्यामुळे सर्व सुरळीत चालू आहे. अयोध्यात श्रीराम मंदिर झाले आहे. महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले आहे. अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी ,विश्वकर्मा योजना ,आदी अनेक योजना मागासवर्गीयांच्या विकासासाठी राबविण्यात येत आहेत. एक रुपयात शेती विमा होत आहे. असे सांगत महाविकास आघाडी साठी व शिर्डीतील उमेदवार विखे पाटील यांच्यासाठी प्रत्येक नेते, कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर, बूथ पातळीवर येत्या तीन-चार दिवसात सर्व काम सोडून प्रचारात तन मनाने सामील होऊन विखे पाटील मोठ्या मताधिक्याने कसे निवडून येतील याचा प्रयत्न करावा. जेवढे मताधिक्य जास्त मिळेल तेवढा राज्यात देशात वरिष्ठ पातळीवर विचार होतो. आपण विखे पाटलांना मुख्यमंत्री करण्याची शिफारस आवाज देऊन करण्याची मागणी करत आहात, मी निरीक्षक आहे. तशी शिफारसही वरिष्ठांकडे आपण करू! मात्र आपणही त्यांना मोठे मोठे मताधिक्य देऊन विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी विखे पाटील यांचे मतदारसंघात मोठे काम असून त्यांना एक लाखाच्या पुढे मताधिक्य मिळवून विजयी करावयाचे आहे. असा आमचा प्रयत्न आहे. असे सांगून त्यांनी देवानंदची स्वागत व गावाच्या वतीने धन्यवाद मानले. यावेळी गणेश कापसे यांनी सर्वसामान्यांचा नेता म्हणजे नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील आहेत. आपण आंध्रमधून येऊन त्यांचे काम बघितले, त्याची आपण दखल घेतली. यावरूनच विखे परिवाराचे काम किती मोठी आहे हे दिसते. विखे पाटील यांचे शिवाय दुसरे कोणी एवढा मोठा विकास साधू शकत नाही. असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी माजी सभापती जिजाबा आगलावे यांनीही नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार आहोत .असा आत्मविश्वास  यावेळी व्यक्त केला. तसेच किरण आगलावे यांनीही नामदार विखे पाटील व सुजय दादा विखे पाटील यांचे काम मोठे आहे. इथे कुटुंबात घराघरात त्यांचे काम आहे. त्यामुळे ते मोठ्या मताधिक्याने विजयी होणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे,मा. सरपंच सोपान पवार, भारत आगलावे, राजेंद्र कापसे, संजय जपे, अमोल शिरोळे,सागर पवार, निलेश आरणे, कैलास सदाफळ, कापसे पटील,सागर पगारे, मारुती कापसे, रणजीत परदेशी, शरद गडकरी, कैलास पळसे, प्रदीप नितनवरे, बर्डे, पवार, माळी, ग्रा. सदस्य दिलीपराव गायकवाड, वाघमारे, एकनाथराव आरणे,मोठ्या संख्येने आदिवासी तसेच अनुसूचित जाती ,जमाती तसेच इतर मागासवर्गीय व मतदार ,ग्रामस्थ ,मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावळीविहीर येथील बैठकीनंतर देवानंदजी यांनी रुई येथेही बैठक घेतली.

Post a Comment

0 Comments