राहाता तालुक्यातील राजुरी येथे विधानसभेचे मतदान शांततेत पार पडले असून राजुरी येथील ४ बूथवर अंदाजे ८१ टक्के मतदान झाले आहे . राहाता तालुक्यातील राजुरी येथील विधानसभेसाठी झालेलंमतदान हे शांततेत पार पडले असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राजुरी येथे ४ बुध असून बुध नं १३०मध्ये ९८६, बुध नं १३१ मध्ये ७२५, बुध नं १३२ मध्ये ७९३ बुध नं १३३ मध्ये २४५ मतदान झाले असून एकुण ३४१९ मतदानापैकी २७४९ मतदारानी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे .राजुरी येथील मराठी शाळेच्या खोल्यामध्ये एकूण चार बूथ होते .या चारही बुथवर सकाळपासून महिलांची मोठी रांग लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते .
0 Comments