भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त



सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे सामाजिक नुकसान व देशापुढील नवीन आव्हाने या विषयावर सुधीरजी लंके यांचे जाहीर व्याख्यान.

संगमनेर (सत्तेचा महासंग्राम न्युज)
भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीरजी लंके यांचे सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे होणारे सामाजिक नुकसान व देशापुढे नवीन आव्हाने या विषयावरील व्याख्याना बरोबरच विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष असिफ शेख यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे डॉ. सुधीरजी तांबे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. १९ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता जोशी हॉटेलच्या मागे, व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये होणाऱ्या जयंती सोहळ्यातील  
   जाहीर पुरस्कारामध्ये भारतरत्न मौलाना आझाद आदर्श समाज रत्न पुरस्कार डॉ. सलीम शेख( श्रीरामपूर), आरोग्य मित्र पुरस्कार शहा नवाज शहा( कोपरगाव), आदर्श व्यंगचित्रकार पुरस्कार अरविंद गाडेकर( संगमनेर) स्वर्गीय मिर्झा खालील शेख, आदर्श समाज रत्न पुरस्कार अफसर तांबोळी( संगमनेर) आदी मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविणे येणार आहे कुठलाही प्रस्ताव न मागवता जे समाजासाठी निस्वार्थपणे काम करतात त्यांची संस्था निवड करते हे खास वैशिष्ट्य आहे
 तरीही भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन एकता सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आसिफ शेख, डॉ. जी पी शेख, संग्राम जोंधळे, अनिल भोसले, अब्दुल्ला हसन चौधरी, जाकीर शेख, मुर्तुजा  बोहरी, जुबेद सय्यद, काझीम शेख, शौकत पठाण, बानोबी शेख, सय्यद
असिफअली,दर्शन जोशी, शानू बागवान, जानकीराम भडकवाड, राजूभाई इनामदार, इरफान शेख, विनोद गायकवाड,  राम सिमरे  आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments