भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त होऊन गावी परतलेल्या मेजर किरण बबनराव जपे यांचे सावळीविहीरला जोरदार स्वागत!व सत्कार!

शिर्डी (राजकुमार गडकरी)
भारतीय सैन्य दलात वीस वर्ष प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्ती घेऊन गावी परतलेल्या मेजर किरण बबनराव जपे यांचे 
सावळीविहीर बु. येथे ढोल ताशाच्या गजरात, भारत माता की, जय  जवान जय किसान, अश्या घोषणा देत व भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन, फुलांची उधळण करून, त्यांची कारमधून मिरवणूक काढण्यात आली व त्यांचा येथे आगळ्यावेगळ्या जोशामध्ये,  स्वागत करत  समस्त सावळीविहीर ग्रामस्थांच्या व मित्र परिवाराच्या वतीने दीपावलीच्या शुभ दिनी  मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. मेजर किरण यांच्या कुटुंबातील महिलांनी पहिल्यांदा सेवानिवृत्त झाल्यानंतर गावात आल्यामुळे त्यांचे औक्षण केले.
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत शिकलेला, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील किरण बबनराव जपे हा ग्रामीण भागातील तरुण लहानपणापासून सैन्य दलात जायची इच्छा असल्यामुळे तसा लहान वयापासूनच प्रयत्नशील होता व त्यातूनच तो भारतीय सैन्य दलात वीस वर्षांपूर्वी भरती झाला. लेह ,लडाख, जम्मू व भारताच्या विविध कानाकोपऱ्यात सैन्य दलात सेवा केल्यानंतर वीस वर्षांनी मेजर  किरण सेवानिवृत्त झाला आहे. सेवानिवृत्ती घेऊन तो दिवाळीच्या दिवशी सकाळी आपल्या मूळ गावी सावळीविहीर 
येथे परतला. येथे किरणचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. भारत माता की जय, जय जवान जय किसान, घोषणा व फटाक्यांची आतषबाजी, फुलांची उधळण यामुळे वातावरण देशमय झाले होते. ढोल ताशाच्या गजरात कारमधून मिरवणूक काढत येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला मेजर किरण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर किरण बबनराव जपे यांचा ग्रामस्थ ,ग्रामपंचायत, सोसायटी, विविध संस्था ,संघटना यांच्या वतीने शाल ,पुष्पगुच्छ, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब जनार्दन जपे म्हणाले की, किरण हा सावळीविहीर येथील तरुण देश सेवेसाठी वीस वर्ष गेला होता. तो देश सेवेत असल्यामुळे गावालाही त्याचा मोठा अभिमान होता. त्याच्याकडून देश सेवा झाली. या निमित्ताने त्याचा गावच्या वतीने सत्कार करत त्याचे स्वागत होत आहे. त्याला पुढील आयुष्य चांगले जावो. अशी सदिच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरपंच ओमेश जपे यांनी सांगितले की, किरण हा ग्रामीण भागातील व  न्यू.इंग्लिश स्कूलमध्ये शाळेत शिकलेला एक तरुण वीस वर्षांपूर्वी देशसेवेसाठी गेला .इतर कोणत्याही नोकरीच्या मागे न ठेवता देश सेवा ही आपली इच्छा त्यांनी पूर्ण केली. आई-वडिलांची त्याला मोठी त्यासाठी साथ मिळाली. त्याला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत. असे त्यांनी सांगितले. तर मा. सभापती जिजाबा आगलावे यांनी सांगितले की, देश सेवा करण्याचा एक मोठा आनंद आहे. देशसेवेमध्ये मोठे समाधान मिळते. व ते समाधान मेजर किरण याने मिळवले आहे. त्याचा आदर्श इतरतरुणांनी घेतला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर मा.उपसरपंच गणेश कापसे यांनी सांगितले की ,आम्ही शाळेत एका वर्गातील विद्यार्थी मित्र, मात्र पहिल्यापासूनच किरणला भारतीय सैन्य दलात जाण्याची मोठी हौस होती व जिद्दीने, प्रयत्नाने तो भारतीय सैन्य दलात भरती झाला व वीस वर्षे त्यांनी देश सेवा केली. देश सेवा करत असताना आपल्या शाळेतील मित्रांनाही तो कधी विसरला नाही. देश सेवेत गेल्यामुळे शाळेला गावाला व मित्रांनाही मोठा अभिमान होता. त्याने आपल्या शाळेचे गावाचे, नाव ,मोठे उज्वल केले .असा  आपला मित्र सेवानिवृत्त होऊन आज येथे आला त्याचे जोरदार स्वागत आहे. व त्यास पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आहेत. असे सांगत मेजर किरण यांनी यापुढे गावातील तरुण देशसेवेसाठी कसे जातील यासाठी तरुणांना प्रेरणा द्यावी. अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी सेवानिवृत्त व सत्कारमूर्ती मेजर किरण बबनराव जपे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
 की,गावातील सर्वांनी एकत्र येऊन माझे जे  अभूतपूर्व स्वागत केले, जो सन्मान केला, त्यामुळे मी खूपच भारावून गेलो आहे. देशसेवा करताना माझे घर, माझी शाळा, माझे गाव, माझे मित्र, याची मला नेहमी आठवण येत असे, देशसेवेमध्ये जो आनंद, स्वाभिमान ,अभिमान, शिस्त, स्वावलंबन व प्रामाणिकपणा शिकायला मिळाला. तो खूप मोठा आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर मनाला वाईट वाटते. मात्र यापुढेही इतर प्रकारे का होईना देश सेवा, समाज सेवा करत राहणार. व गावातील इतर तरुण मुलांना देश सेवेसाठी जाण्यासाठी प्रेरणा देत राहील. असे सांगितले व माझे स्वागत, माझा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे यावेळी त्यांनी आभार मानले.
यावेळी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे, उपसरपंच विकास जपे, मेजर किरणचे वडील बबनराव जपे,  ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे, डांगे पाटील, संजय जपे ,दत्तू आगलावे, दिलीप सदाफळ,सोसायटीचे मा. चेअरमन कैलासराव सदाफळ, राजेंद्र आगलावे, गोकुळ जपे, संदीप विघे, विक्रम आगलावे, सोपान पवार, बबन जपे, सुनील जपे, महेश जपे, अमोल शिरोळे, प्रभाकर जपे, कैलास पळसे, शरद आगलावे, राहुल आगलावे, नाना पवार, संतोष आगलावे, सतीश जपे, शरद गडकरी, पांडू सोळसे, कारभारी पाचोरे, एकनाथ आरणे, जालिंदर जपे , भाऊसाहेब सदाफळ, बापू सदाफळ, गणेश पाचोरे, महेंद्र पवार,आदीसह गावातील तरुण, विविध संस्थांचे, संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments