श्री साईनाथ रुग्‍णालयात मोफत त्‍वचा रोग तपासणी शिबीर

शिर्डी (प्रतिनिधी)श्री साईबाबा संस्‍थानचे रुग्‍णांलयांमध्‍ये  नेहमीच रुग्‍णांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. त्‍याचाच एक भाग म्‍हणुन  दि.२४/१०/२०२४ ते दि.२६/१०/२०२४  असे तीन दिवस श्री साईबाबा संस्‍थानचे श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रुम)   येथे  मोफत त्‍वचारोग तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन करण्‍यात  आलेले आहे. या शिबीरामध्‍ये सुमुखा लक्ष्‍मी व्‍यंकटेश्‍वरा  चॅरीटेबल ट्रस्‍ट म्‍हैसुर यांचे तज्ञ डॉक्‍टर  व  श्री साईनाथ रुग्‍णालयातील  तज्ञ डॉक्‍टर हे  पिपंल्‍स, सोरायसीस, वांग , फंगल इन्‍फेक्‍शन, त्‍वचेवरील पांढरे कोड, केंस गळणे, केसातील कोंडा अशा त्‍वचेच्‍या विविध आजारांवर मोफत तपासणी करुन उपचार करणार आहेत. 

    तरी  सर्व गरजवंत रुग्‍णांनी या शिबीरात  सहभागी होवुन लाभ द्यावा असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थानचे  मुख्‍य कार्यकारी अधिकारी,  श्री गोरक्ष गाडीलकर  भा.प्र.से यांनी केलेले आहे.
  शिबीराकरीता श्री साईनाथ रुग्‍णालय (२०० रूम) शिर्डी येथे नाव नोंदणी सुरु असुन फोन नंबर - ०२४२३-२५८५५५ वर ही संपर्क साधुन नाव नोंदणी करता येईल.

Post a Comment

0 Comments