शिर्डी (प्रतिनिधी)
आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायामध्ये फार मोठी संत परंपरा आहे. माऊली ज्ञानोबाराय, संत तुकाराम महाराजांपासुन ते आजतागायत सर्वच संतांनी सामाज मनावर वारकरी विचारांची पेरणी करतांना समाजमनामध्ये सेवाभाव वृत्ती अखंडपणे रुजवली असे प्रतिपादन ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी केले.
सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम स्थापनेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय भजन - कीर्तन महोत्सवाप्रसंगी पहिल्या दिवसाचे कीर्तन पुष्प गूंफतांना महाराज बोलत होते.
सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम स्थानपनेचा 10 वा वर्धापन दिन सोहळासोमवार, दिनांक -28 ऑक्टोबर 2024 मोठ्या उत्साहात साजरा झाला. या दिवशी
सकाळी 8:00 वाजता यजमान व सद्गुरू आश्रमातील विद्यार्थ्यांच्या हस्ते ब्रम्हलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज व सकल देवतांचे पूजन, आरती करण्यात आली. 8:30 वाजता पंचपदी भजनाने दोन दिवसीय महोत्सवाची सुरुवात झाली. सकाळी 9:15 ते 10:15 पर्यंत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या बाराव्या आध्यायाचे पारायण संपन्न झाले. सकाळी 10:30 वाजता ह.भ.प.संजय महाराज जगताप यांची कीर्तनरुपी सेवा संपन्न झाली. त्यावेळी ह भ प संजयजी जगताप महाराज बोलत होते.महाराज पुढे म्हणाले की, जगात भारत भूमी ही महान आहे. त्यातही महाराष्ट्र भूमी व महाराष्ट्र भूमीतही नेवासा भूमी अति पवित्र आहे. कारण ज्ञानेश्वरीच्या रूपाने जगाला उपदेश देणाऱ्या ग्रंथाची निर्मिती नेवासा भूमीत झाली.महाराज पुढे म्हणाले की, विश्वामध्ये वारकरी सांप्रदायाची परंपरा अप्रतिम आहे. जगामध्ये अनेक धर्म, पंथाच्या उपासना आहेत. परंतु वारकरी सांप्रदायाची उपासना सर्वश्रेष्ठ आहे. काया, वाचा, मनाने जो ज्ञानेश्वरीची उपासना करील त्यास ब्रम्हपद प्राप्त होते.महाराज पुढे म्हणाले की, सगुण व निर्गुण उपासनेचा समन्व्य ज्ञानेश्वर माऊलींनी साधला. वारकरी सांप्रदायात बंकटस्वामीनीं भाव, भक्ती, श्रद्धेची क्रांती केली. आपल्या गुरुवर श्रद्धा नसेल तर आपली भक्ती व्यर्थ आहे. साधकांच्या जीवाला आकार, उकार देणारा ग्रंथ म्हणजे दासबोध होय. संतांचे अंतःकरण हे मातेपेक्षाही मृदू असते असे ते म्हणाले. महाराज शेवटी म्हणाले की, उद्धवजी महाराज हे वारकरी सांप्रदायातील परमार्थ विचारांची उच्च अवस्था असणारे व्यक्तिमत्व आहे.कीर्तनानंतर वेगवेगळ्या प्रकारची सेवा देणाऱ्या दात्यांचा गुरुवर्य बाबांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.उपस्थित सर्व भाविकभक्तांचे गुरुवर्य बाबा ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांनी स्वागत करून आभार मानले. सकाळचा नाष्टाप्रसाद सेवा श्री. विष्णुपंत ठोसर भाऊसाहेब(वंजुळपोई, ता. राहुरी), संतपूजन सेवा श्री. सुभाष पांडुरंग पा गवांदे (भालगाव, वैजापूर) व फराळ प्रसादाची पंगत कै. सौ. रंजनाताई व कै. श्री. नानासाहेब विठ्ठल पा बानकर यांच्या स्मरणार्थ श्री. विकास नानासाहेब पा बानकर(उपाध्यक्ष,शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, शनिशिंगणापूर) व बानकर परिवाराच्या वतीने देण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, कृषी,विधी न्याय, व्यापार आदी क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments