शिर्डी (प्रतिनिधी) आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्यां शिर्डी येथील श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने संस्थेच्या सभासदांची जशी दिवाळी भेट देऊन ही दिवाळी गोड करण्यात आली .
तशीच शिर्डी सह परिसरातील पत्रकारांचीही या संस्थेमार्फत दिवाळी गोड करण्याचा संस्थेने प्रयत्न केला. त्याबद्दल सभासदांप्रमाणेच पत्रकारांमधूनही या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देण्यात येत आहेत.
शिर्डी येथील श्री साईबाबा एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने दरवर्षेप्रमाणे यावर्षीही संस्थेच्या सभासदांना 50 किलो साखर, पाच लिटर गोड तेल, ,मिठाई , फरसाण, भिंतीवरील घड्याळ आदी दिवाळी भेट देण्यात आली व सभासदांची ही दिवाळी अधिक गोड करण्याचा प्रयत्न पदाधिकाऱ्यांनी केला. त्याचबरोबर शिर्डी व परिसरातील पत्रकारांनाही या संस्थेने दिवाळी भेट म्हणून दहा किलो साखर, मिठाई ,फरसाण व भिंतीवरील घड्याळ दिवाळी भेट म्हणून देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या संस्थेवर गेल्या सहा महिन्यापूर्वी नवीन पदाधिकारी आले आहेत .त्यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये विविध चांगले व धाडसी निर्णय घेतले आहेत. अशा या चांगल्या निर्णयाची प्रसिद्धी शिर्डी व परिसरातील पत्रकार सातत्याने करत असतात. चांगल्या गोष्टीची प्रसिद्धी करणे हे पत्रकारांचे काम असून ते प्रामाणिकपणे करत असल्यामुळेच या संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी शिर्डीतील पत्रकारांनाही संस्थेमार्फत सर्व संचालक मंडळाच्या संमतीने दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला .शिर्डी व परिसरातील सुमारे 60 ते 70 पत्रकारांना दिवाळी भेट म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून हि दिवाळी भेट देण्यात आली व त्याचबरोबर श्री साईबाबा एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव तुकाराम पवार, व्हा. चेअरमन पोपटराव भास्कर कोते, तसेच संस्थेचे संचालक महादू कांदळकर, संभाजी तुरकणे, मिलिंद दुनबळे, भाऊसाहेब लवंडे ,सौ सुनंदा जगताप, कृष्णा आरणे ,देविदास जगताप ,तुळशीराम पवार, इकबाल तांबोळी ,सौ लता बारसे, भाऊसाहेब कोकाटे, विनोद गोवर्धन कोते ,रवींद्र बाबूराव गायकवाड ,गणेश अहिरे, रंभाजी गागरे, व तज्ञ संचालक भाऊसाहेब लबडे, सचिव नबाजी नामदेव डांगे, सहसचिव विलास गोरखनाथ वाणी व संस्थेचे सर्व कर्मचाऱ्यांकडून सभासदांप्रमाणेच शिर्डी व परिसरातील पत्रकारांनाही दिवाळीच्या गोड गोड शुभेच्छा देण्यात आले आहेत. त्याबद्दल पत्रकारांकडूनही संस्था व संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे धन्यवाद मानन्यात येत आहे.
0 Comments