अनिल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्ष रोपाचे वाटप

*निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज*
               --- प्रभाकर रहाणे.

संगमनेर-- दोन वर्षांपूर्वीचा कोरोना काळ आमच्यासाठी कटू स्वप्न ठरले. मात्र या काळात प्राणवायू अर्थात ऑक्सिजन कीती मौल्यवान आहे याची समस्त जगतातील मनुष्यांना जाणिव झाली. वस्तुतः निसर्गाने या प्राणवायूचे दान मानवाला मोफत व मुक्तहस्ते दिलं आहे. वाढती गरज आणि बदलत्या परिस्थितीत हे दान टिकवणे माणसाच्या हातात आहे. याचाच महत्वपूर्ण भाग म्हणजे वृक्षारोपण होय. प्रत्येक मनुष्याने जाणिवेने वृक्षारोपण करावे ही गरज आहे. असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर रहाणे यांनी केले.
 
निमित्त होते विविध समाज समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल भोसले यांच्या वाढदिवसाचे. यानिमित्त पारंपरिक वाढदिवसासाठी केल्या जाणाऱ्या खर्चास फाटा देऊन भोसले यांनी उपस्थित सर्वांना एक एक वृक्षरोप देऊन एक उत्तम सामाजिक संदेश दिला.  
अनिल भोसले यांनी सातत्याने समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत. सर्व धर्मियांशी चांगला समन्वय ठेवून सर्वांना संघटितरित्या एकत्रित करून विविध सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करून, ते सोडविण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करत असल्याची भावना  कारभारी देव्हारे, संजय क्षत्रिय, आसिफ शेख, अँड. प्रसाद सांगळे, अजिजभाई ओहरा, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष आदित्य घाटगे, भाऊसाहेब वैद्य, राजूभाऊ इनामदार, मूर्ताज बोहरी, श्रीधर भोसले आदींनी व्यक्त केल्या.
 आपण प्रत्येकाने अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी उपस्थितांना साद घातली. या स्तुत्य उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या उपक्रमास प्रभाकर चांदेकर, वंदना भोसले, एजाज शेख, अकबर शेख, अनुप कदम, सनी गायकवाड जनार्दन पुजारी, अमित पाटणकर, शांताराम आडेप, संदीप मोकळ, शौकत पठाण, बानाेबी शेख,  
 आदींसह सर्व धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीधर भोसले यांनी केले तर वंदना भोसले यांनी शेवटी आभार मानले.

Post a Comment

0 Comments