शिर्डी (राजकुमार गडकरी)
अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेर येथे धांदरफळ येथील सभा संपल्यानंतर माजी खासदार सुजय विखे पा.यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र संताप व्यक्त करत या घटनेचा राहाता तालुक्यात ठीक ठिकाणी निषेध व्यक्त होत आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथेही सोमवार 28 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी ग्रामस्थांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या युवा संकल्प मेळाव्यानंतर विरोधकांनी सभा आटोपून घरी चाललेल्या कार्यकर्त्यांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये गाड्यांचे नुकसान झाले. अनेक पुरुष महिला युवक जखमी झाले. या घटनेसंदर्भात तीव्र संताप सावळीविहीर बुद्रुक येथे व्यक्त करण्यात आला असून सोमवारी सकाळी ग्रामस्थ व भाजपाचे तसेच महायुतीचे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांनी गावातून मोर्चा काढत
या घटनेचा सावळीविहीर बुद्रुक येथे जाहीर निषेध नोंदवला.
त्यानंतर सदर निषेध मोर्चा हा बाजारतळ येथे आल्यानंतर मोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली. संगमनेर येथील घटनेचा जाहीर निषेध ,जाहीर निषेध!!
माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांचा विजय असो, ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचा विजय असो!! भारतीय जनता पार्टीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.या वेळी बाळासाहेब जनार्धन जपे म्हणाले की, संगमनेर येथिल धांदरफळ येथे झालेल्या महायुतीचे नेते मा. खासदार सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प मेळाव्याच्या सभेनंतर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी महायुतींच्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची तोडफोड करून गाड्या जाळण्यात आल्या. महिला व कार्यकर्त्यांना धक्काबुकी करण्यात आली. यावेळी अनेकांच्या हातात काठ्या, लोखंडीराड, पेट्रोल भरलेल्या बाटल्या होत्या. असे चित्रफिती वरून दिसते. हा कट होता असे सांगत याचा निषेध म्हणून सावळीविहीर बु. येथे घोषणाबाजी करत संगमनेर येथील घटनेचा जाहीर निषेध आम्ही ग्रामस्थांच्या वतीने करत असल्याचे ते म्हणाले.तर सरपंच ओमेश साहेबराव जपे म्हणाले की, अनेक जण आता आमदारकीचे स्वप्न बघत आहेत. पण त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहणार आहे. कोणीही काही करू शेवटी विजय आमचाच आहे. सुजय विखे पाटील यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. असे सांगत शिर्डीत नामदार राधाकृष्ण विखे पाटीलच निवडून येणार आहेत. असे म्हणत संगमनेर येथे झालेल्या घटनेचा ग्रामस्थच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. असे ते शेवटी म्हणाले.
याप्रसंगी उपसरपंच विकास जपे. माजी सरपंच सोपानराव पवार. ग्रामपंचायत सदस्य गणेश आगलावे. आशिष आगलावे,पोलीस पाटील सुरेश वाघमारे. मा. पं.समितीचे सभापती जिजाबा आगलावे. राजू जपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम जपे.किरण आगलावे. विठ्ठलराव मातेरे. नानासाहेब कदम.संजय जपे. सतीश जपे, राजेंद्र आगलावे, राजू वाघमारे. सचिन वाघमारे. प्रदीप नितनवरे. आनंद जपे. रणजीत परदेशी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments