टाकळीभान( प्रतिनिधी )- श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर वांगी परिसरातील माऊली प्रतिष्ठान संचलित प्राईड अकॅडमी या शैक्षणिक संकुलात विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय स्तरावर रंगोत्सव स्पर्धा मुंबई आयोजित स्पर्धेत प्राईड अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या स्पर्धेत आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केले.
कुमारी ओवी सचिन उंडे इयत्ता चौथीतील विद्यार्थिनीने ट्रॉफी व सर्टिफिकेट चित्रकला स्पर्धेत प्राप्त केले. हस्ताक्षर स्पर्धेत हर्षदा बाळासाहेब जाधव या विद्यार्थिनी गोल्ड मेडल मिळवले. तसेच हर्ष अमोल जाधव इयत्ता सहावी, साईश्वरी योगेश जगताप पाचवी, स्वरा अतुल शिंगोटे इयत्ता तिसरी, देवांशी वैभव पवार नववी, ईश्वरी दत्तात्रय नाईक नववी, आराध्या कांतीलाल पवार पाचवी, स्वरूप विकास बोरुडे तिसरी व आरोही दिलीप कसबे दुसरी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे गोल्ड सिल्वर ब्रांज मेडल व सर्टिफिकेट मिळवले. राष्ट्रीय स्तरावर इतक्या मोठ्या संख्येने एका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळालेले मेडल व ट्रॉफी आणि सर्टिफिकेट हे कौतुकास्पद आहे.
याचबरोबर शाळेतील शिक्षिका रूपाली सिन्नरकर यांना उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षिका म्हणून या संस्थेने गौरवले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद जोशी यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. व शाळेला उपक्रमशील शाळा व उत्कृष्ट शाळा म्हणून मानचिन्ह देण्यात आले. यावेळी शाळेच्या संचालिका डॉ. वंदनाताई मुरकुटे मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक करत असेच विविध स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन करण्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक श्री माऊली मुरकुटे सर व संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.सर्व पंचक्रोशीतून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे. शाळेच्या या यशाबद्दल सर्व पालकांनी, मनापासून कौतुक केले.
0 Comments