काकासाहेब गोरखे यांचे हस्ते सचिन गायकवाड लिखित सावली या कादंबरीचे प्रकाशन 100 व्या कादंबरीचे प्रकाशन लवकरच होईल... वसंतराव सकट



श्रीगोंदा :-(सत्तेचा महासंग्राम न्युज)
सचिन गायकवाड लिखित सावली या कादंबरीचे प्रकाशन चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष काकासाहेब गोरखे यांचे हस्ते करणेत आले त्याप्रसंगी बहुजन समता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी बोलताना 100व्या कादंबरीचे प्रकाशन ही लवकरच होईल तसें प्रयत्न सचिन गायकवाड यांनी करावे अशे मत शुभेच्छा व्यक्त करताना सकट यांनी मांडले .


कादंबरीतीलमुख्य पात्र दुर्वा व सावली यांचे मनातली घुसमट मांडणारी सावली ही कादंबरी आहे कब्बड्डी चे सामन्यातून दुर्वाची कश्या पद्धतीने छाप पडते व सावलीचे मनातील भावना कब्बडीचे मैदानातून कश्या पद्धतीने साकार होतात त्याचे हुबेहूब चित्रण लेखकाने मांडनेचा प्रयत्न केलेला असून तरुणाईला योग्य मार्ग दाखवनेचे काम लेखक सचिन गायकवाड यांनी केला आहे 
या वेळी निलेश लंके यांचे स्वीय सहाय्यक रामदास अडागळे,आधुनिक लहुजी शक्तीचे जिल्हा अध्यक्ष संतोष शिंदे, बाळासाहेब लोंढे, गणेश शिंदे, विजय शिंदे,दत्ता गोरखे रुपेश सकट, महाराज 
यांनी आपले मनोगत व्यक्त करून शुभेच्छा व्यक्त केल्या यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते व वाचक उपाशीत होते यावेळी रामदास अडागळे यांनी 2तर काकासाहेब गोरखे यांनी सामाजिक योगदान म्हणून 51 कादंबऱ्या विकत घेऊन लेखकास उसपूर्त असा प्रतिसाद देऊन शब्बासकीची थाप पाठीवर मारली

Post a Comment

0 Comments