निष्क्रिय अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करा छावाब्रिगेडची मागणी.



श्रीरामपूर (वार्ताहर)


महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री या.ना. राधाकृष्ण विखे साहेब यांना आदिवासी विकास प्रकल्प राजुर येथील निष्क्रिय व कर्तव्य शून्य अधिकारी देवकन्या बोकडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्या महिला अधिकाऱ्याने त्यांच्या पदाचा दुरुपयोग करून छावा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वाघ यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला होता त्या विरोधात अनेक सामाजिक कार्यकर्ते व अधिकारी मित्रांनी सांगितले यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली पाहिजे म्हणून माननीय विखे साहेबांना निवेदन देण्यात आले.

 तसेच 2023 साली राजुर आदिवासी प्रकल्प या ठिकाणी सुनील बारसे नावाचे अधिकारी होते त्यांनी अग्निशमन नळकांडे यांच्यामध्ये मोठा घोटाळा केला त्यांनी आझाद सेवाभावी संस्था यांना अग्निशमन नळगंडे भरण्याची टेंडर दिले हे टेंडर देताना संस्था ही तीन वर्षाचा अनुभव असलेली पाहिजे पण कोणत्याही प्रकारचा अनुभव  नसणारी आजाद सेवाभावी संस्था श्रीरामपूर यांना अग्निशमन नळकांड्याचे काम देण्यात आले ही संस्था मार्च 2023 मध्ये रजिस्ट्रेशन झाली व मार्च 2023 मध्ये त्यांना टेंडर देण्यात आले ज्या संस्थेला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही GST चे बिल सुध्दा नाही त्या संस्थेला टेंडर देऊन आदिवासी मुलांच्या जीवितासंग खेळण्याचा प्रकार श्री बारसे यांच्या माध्यमातून झालेला असून यासंदर्भात महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे साहेब यांना निवेदन देण्यात आले सध्या बारसे हे अधिकारी हिंगोली कळमनुरी या ठिकाणी आहे यांना निलंबित करण्यासाठी हे निवेदन छावा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेला आहे माननीय साहेबांनी आदिवासी मंत्री अशोक वुईके साहेब यांना लवकरच कारवाई करण्याचे पत्र काढतो असे आश्वासन दिले
निवेदन देताना छावा ब्रिगेड प्रदेश महासचिव राहुल रेळे साहेब उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे अहिल्यानगर संपर्कप्रमुख एजाज पठाण जावेद सय्यद मनोज भोसले भरत तावरे प्रीतम माने या सहा अनेक छावा ब्रिगेड चे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments