दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.27- अजिंठा डोंगरात ढालकी च्या धबधबा जवळ असंणाऱ्या पठारावर वनस्पती अभ्यासासाठी गेलेल्या सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक तोंडापूर येथील वन्यजीव रक्षक भूषण कानडजे व डॉ. संतोष पाटील यांना काल एका खडकावर उन्ह खात बसलेल्या "पेनीनसुला रॉक अगाम" या सरड्याच्या प्रजातीचे दर्शन घडले. मुख्यत्वे दक्षिण भारतात केरळ, कर्नाटक, आंध्र आदी राज्यात आढळनाऱ्या या जातीचा महाराष्ट्रात दुर्मिळ अधिवास आहे.
या प्रजातीस उन्ह अधिक आवडत असल्याने ती खडकावर, कडयाच्या भिंतीवर उभ्या अवस्थेत बराच वेळ स्थिर उभा असतो.याची झेड.एस. आय. व लोक जैवविविधता नोंद वहीत नोंद करण्यात आली आहे.
--- रंग वैविध्य- काल दिसलेला 'अगाम ' हा नर असून तो मिलनासक्त असून मादीस आकर्षित करण्यासाठी त्याचा रंग गडद लाल - भगवा व चमकदार बनतो.पाठीवर लाल - भडक भगवा रंगाचा चट्टा असतो, तोंड, ओठ हे ही लाल भगवे असते.शेपटी कडील भाग, पोट, पाय गर्द काळ्या रंगाचे असते जे खडकावर लपण्यासाठी (कॅमोफ्लॅगिंग ) निसर्ग देणं आहे.मादीस आकृष्ठ करण्यासाठी तो उघड्या खडकावर पुश- अप सारख्या हालचाली करतो. यातून त्याचे फिटनेस जाणवते जे मादिस आकृष्ठ करते.
-- नाम महिमा-- भारताच्या तिन्ही बाजूने समुद्र तथा पाणी वेढलेले असल्याने या भुभागास "पेनिनसुला" म्हटले जाते.खडकावर जास्त वेळ अधिवास व "अगोमिडा" गणातील असल्यामुळे उपरोक्त नाम विधान आहे.
---- जैवविविधतेत भर मात्र वाढते तापमानाचा इंडिकेटर" - ही प्रजाती ज्या भागात उन्हाळ्यात अधिक तापमान असते तिथे अधिवासास प्राधान्य देणारी आहे. जेथे जास्त कीटक व खडकाळ भाग, तेथे यास अन्न व प्रजननास पोषक वातावरण लाभते. सरड्याची ही प्रजाती फक्त्त कीटक भक्षी असून कृषी व अनेक वनस्पती वरील कीटक खाऊन नैसर्गिक कीड नियंत्रक आहे.
डॉ. संतोष पाटील, जैवविविधता संवर्धक,
0 Comments