भारत देशात प्रतिभा संपन्न असे मोठे क्रिकेटचे आहे भांडार!साईदर्शनानंतर प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान यांनी व्यक्त केले मत!

शिर्डी ( प्रतिनिधी) भारत देश हा सर्व क्षेत्रात प्रतिभा संपन्न देश असून क्रिकेटमध्ये तर येथे मोठे प्रतिभा संपन्न असे भांडार आहे. भारतामध्ये मोठे प्रतिभा संपन्न असे क्रिकेट खेळाडू आहेत. मात्र त्यांना सपोर्ट करण्याची गरज आहे. असे मत प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान यांनी व्यक्त केले.
क्रिकेटपटू झहीर खान व सागरीका यांनी गुरुवारी शिर्डीला येऊन श्री साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले.भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू झहीर खान  यांनी सपत्‍नीक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर  श्री साईबाबा संस्‍थानचे वतीने साईमंदीर प्रमुख विष्‍णु थोरात व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी त्यांचा शाल व श्री साई मुर्ती देवून सत्कार केला. यावेळी  श्री साईबाबा संस्‍थानचे संरक्षण अधिकारी रोहीदास माळी उपस्थित होते.
 यावेळी क्रिकेटपटू झहीर खान पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, आपले जन्मस्थानच शिर्डी जवळ श्रीरामपूरचे आहे. शिर्डीला पूर्वी क्रिकेट टूर्नामेंट खेळायला यायचो, त्यावेळेस दर्शनाला यायचो. शिर्डीत आता खूप बदल झाला आहे. हा बदल माझ्यासमोर होत गेला हे मी पाहिले आहे. माझ्याप्रमाणेच सागरीका  साईभक्त आहे .ती नेहमी साई दर्शनाला येत असते.
शिर्डीला नेहमीप्रमाणे साई दर्शनाला आलो. साईंवर श्रद्धा आहे म्हणूनच येथे येत असतो. साईबाबांकडे सगळ्यांचे चांगले होवो हीच प्रार्थना केली, दुवा मागितली. असे सांगत राजस्थानमधील एक  सुशीला मीना नावाची मुलगी आपल्या ॲक्शन प्रमाणेच गोलंदाजी करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले असून ते बरोबर आहेत. सचिन तेंडुलकर यांनी ही या मुलीला सपोर्ट केला पाहिजे असे म्हटले आहे व माझेही हेच मत आहे. असे यावेळी झहीर खान यांनी सांगितले.
झहीर खान शिर्डीत आल्याचे समजताच झहीरखानला पाहण्यासाठी त्याचे चाहते, क्रिकेट खेळाडू ,साईभक्त, ग्रामस्थ यांनी संस्थान प्रवेशद्वारासमोर गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments