मा. महसूल मंत्र्यांचे निर्णय तसेच पुढे चालू राहणार! व आणखी काही नवीन निर्णय घेऊन महसूल खात्यात अमूलाग्र बदल करणार----महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे

शिर्डी( प्रतिनिधी)
शिर्डी मध्ये 12 जानेवारी 2025 पासून भाजपाचे अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला राज्यातून पंधरा हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते होणार असून समारोप गृहमंत्री नामदार अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. राज्याच्या 14 कोटी जनतेला दिलेली वचनपूर्ती या अधिवेशनात महत्त्वाची ठरणार आहे.

 या अधिवेशनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यातील सर्व मंत्री महोदय, तसेच काही केंद्रीय मंत्री व भाजपाचे राष्ट्रीय राज्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी 11 जानेवारी 2025 ला राज्याच्या पक्षाच्या कोर कमिटीची बैठकही शिर्डीतच  होणार आहे. असी माहिती राज्याचे महसूल मंत्री नामदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिर्डीत दिली.
 महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे मंत्री यांनी  शिर्डीला येऊन श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर व प्रशासकिय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे उपस्थित होते. साई दर्शनानंतर पत्रकांराशी बोलताना ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आपण  शिर्डीला 29 वर्षापासून 26 एप्रिल ला येतच असतो. मात्र यावेळी 12 जानेवारीला भाजपाचे अधिवेशन आहे. साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. सर्वांचे मंगलमय होऊ दे अशी साई चरणी प्रार्थना केली व साईबाबा सर्वांची इच्छा पूर्ण करतात .असे त्यांनी सांगितले.
 आमच्या राज्याने मागील अडीच वर्षात चांगले निर्णय घेतले आहेत. त्याचप्रमाणे माजी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल खात्यात मोठे निर्णय घेतले हे निर्णय पुढे तसेच चालू ठेवणार असून आणखी महसूल खात्यामध्ये नवीन निर्णय घेऊन महसूल खात्यात अमुलाग्र आग्रह बदल करण्याचा प्रयत्न राहणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. बीड येथील घटने संदर्भात बोलताना म्हणालेकी,  या प्रकरणा संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितले आहे .जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीत जे निष्पन्न होईल ते महाराष्ट्राला कळणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलीस तपासात कोणताही अडथळा येणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नामदार चंद्रशेखर बावनकुळे हे शिर्डीत आल्यानंतर त्यांच्या समवेत राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील तसेच जिल्ह्यातील आमदार मोनिकाताई राजळे, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार विक्रम पाचपुते, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, संस्थांनचे माजी विश्वस्त सचिन तांबे, तसेच जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी  आदी यावेळी उपस्थित होते. आगामी भाजपा अधिवेशना संदर्भात यावेळी चर्चा झाली.

Post a Comment

0 Comments