मध्य प्रदेशातील साईभक्त सौ. पूजा व जुगल किशोर जयस्वाल यांनी साईबाबांच्या चरणी 14 लाख 20 हजार आठशे रुपयांचा स्वुवर्ण मुकुट केला अर्पण!

शिर्डी ( प्रतिनिधी)
 श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भाविकांची श्रद्धा आहे. भाविक साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक २७ डिसेंबर २०२४ रोजी इंदौर, मध्‍यप्रदेश येथील साईभक्‍त जुगल किशोर जैसवाल व सौ. पुजा जुगल जैसवाल यांनी साईचरणी २०० ग्रॅम सोने व ४७ ग्रॅम चांदी इतक्‍या वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला.


 असल्‍याची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी दिली. या मुकूटाची किंमत १४ लाख २० हजार ८०० रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आला. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा शाल व श्री साईबाबांची मुर्ती देवून सत्‍कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments