टाकळीभान घोगरगाव शिवारात गट न . २७१ मधील पाच एकर क्षेत्रापैकी अडीच एकर उस जळून खाक

टाकळीभान प्रतिनिधी-टाकळीभान घोगरगाव शिवारात गट न . २७१ मधील पाच एकर क्षेत्रापैकी अडीच एकर उस जळून खाक ,
  
 बुधवार दि.२३ - १० - २०२४ रोजी तीन वाजता लाईट आल्या नंतर खांबावर जाळ झाला व उसाने पेट घेतला शेजाऱ्यांनी शेतकरी अनिल बबनराव पटारे यांना फोन करून कळवीले ते शेतावर येवू पर्यन्त बराचसा उस जळाला . अशोक स का अशोकनगर यांची आग्नीशमन गाडी आली परंतू चिखल असल्यामुळे ती शेतापर्यंनत पोहचु शकती नाही . 

    शेजारी सर्व शेतकऱ्यांनी उस विझवन्यास मदत केली . पाचएकर पैकी आडीच एकर उस सुरक्षित राहीला . तरी एम एस सीबी चे अभियंता यांनी पंचनामा करून शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीपोटी त्याला काही आर्थिक मदत व्हावी, अशी अनुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे,

Post a Comment

0 Comments