शिर्डी (प्रतिनिधी)
कार्तिकी एकादशी म्हणजे सर्व वारकऱ्यांसाठी  दिवाळी   कारण 
  ज्या प्रमाने मुलीला माहेरची आठवण येती त्याच प्रमाणे संताना  संतांची भेटीची ओढ असते ज्ञानोबारायांची यात्रा  व संजीवन समाधी सोहळा आणि दर्शनाची असते.  याच यात्रे नंतर  येती ती त्र्यंबकेश्वर यात्रा, निवृत्ती दादाची समाधी सोहळा . व यात्रा मोठा धार्मिक उत्सव व सोहळा असतो. 

वारकऱ्यांना वारीची ओढ ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी गात गात वारकरी अगदी तलीन होतो .  सर्वांना माहीत आहे की ज्ञानोबा रायाची समाधी आळंदी ,
तुकाराम महाराजांची समाधी देहू, संत एकनाथ महाराजांची समाधी पैठण 
 निवृत्ती महाराजांची समाधी त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वर मध्ये नेमकी कुठे? हे मात्र बहुतेक लोकांना माहीत नसेल. याचा शोध कोणी लावला हे देखील बहुतेक लोकांना माहीत नसेल.
काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जगवती*
साधू संत हे आपल्या स्वताचे जीवन या समजाकरिता वाहून देतात . आपले खरंच भाग्य आहे की आपन संताच्या भूमीत जन्म घेतला . दक्षिणेस गोदावरी नदी त्यात एक बेट म्हणजे सरला बेट .. बेट म्हणजे सामान्य नाही आपल्या करिता प्रती पंढरपूर आळंदीच करणं सद्गुरू योगीराज गंगागीरी महाराज*
माहा विष्णूचा अवतार स्वमी निवृती दातार!
गंगागिरीजी  महाराजाना निवृत्ती महाराजांनी स्वप्नांत येऊन दृष्टांत दिला . त्र्यंबकेश्वर येथे माझी समाधी आहे .पण ती नेमकी कोणती करणं घनदाट जंगल चिंच पिंपळाची झाडी शेकडोंनी समाधी यात नेमकी कोणती

 .? सदगुरु गंगागिरि महाराज व त्र्यंबकेश्र्वर जवळील  ह भ प श्री रामभाऊ पाटील जिकुळकर यांनी त्या समाधीचा सोध घेतला. हे आज आम्हाला नारायणगिरी महाराज यांचे शिष्य ह भ प संजयजी महाराज यांच्या मुखातून ऐकायला भेटले.
सर्वांचे श्रद्धा स्थान गुरू नारायणगिरी महाराज यांचा प्रती आवाज असणारे ह भ प माऊली महाराज संगमनेर कर यांचे अचानक  आपल्याला सोडून गेले त्यामुळे  गुरु बंधू म्हणून संजय जी महाराज जगताप यानी त्यांना नुकतेच आदरांजली वाहिली  आहे.व नंतर
तीर्थक्षेत्र भऊर ते तीर्थ क्षेत्र त्र्यंबकेश्र्वर असा पायी दिंडी सोहळा  पार पडला .
वारी करून आल्या नंतर वीणा पूजन असते  .कारणं सर्व जण वारी करू शकत नाही. पण वारी करून आलेला वारकारी व .विणे करू यांचे दर्शन मात्र सर्वांना घडले म्हणून विना पूजन असते. 
 हे वीणा पूजन  ह भ प श्री राजेंद्र पंढरीनाथ पाटिल जगताप यानी केलं. व  महा प्रसादाचा कार्यक्रम झाला.