दिलीप शिंदे
सायगाव दि.२० - पुरातन काळा पासून ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी ला अरण्य षष्ठी म्हटले जाते. सर्व सृष्टी ला पोसणाऱ्या निसर्ग देवतेच्या आयुष्यासाठी तिचे पावित्र्य जपण्यासाठी तिचे पूजन या निमित्ताने केले जाते.
षष्ठी व जागतिक योग दिनाचे औचित्य साधत सिल्लोड येथील पर्यावरण संवर्धक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सह कार्यवाह डॉ. संतोष पाटील यांनी मोढा बु. जवळील गायरान वाडी शाळेच्या प्रांगणात दुर्मीळ होत असलेला हिरडा, बेहळा, आवळा या त्रिफळ म्हटले जाणाऱ्या रोपांचे विद्यार्थ्यांचे निसर्ग रक्षणात योगदान असावे म्हणून विद्यार्थी व शालेय समिती मार्गदर्शक गणेश पा.ढोरमारे , गणेश हावळे, कैलास ढोरमारे,मु.अ.संदीप मोरे, शिक्षिका प्रेमलता जाधव, अंगणवाडी सेविका राणी सोनगीरे,उज्वला राऊत आदींच्या हस्ते रोपण केले व त्यांनाच संगोपनाचे दायित्व देण्यात आले.शाळेतील वेदिका ढोरमारे या विद्यार्थीने अरण्य देवतेची वेषभूषा साकारली. डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना निसर्ग देवतेचे महत्व पटवून देऊन शासन निर्देशानुसार शाळेत हरित सेनेची स्थापन केली. त्रिफळाचे आयुर्वेदात शेकडो अनेक फायदे सांगीतले आहे. मुख्याध्यापक संदीप मोरे , सह शिक्षिका प्रेमलता जाधव यांनी हा उपक्रम यशस्वी करून माझी शाळा - हरित शाळा बनवण्याचा निर्धार व्यक्त केला. हिरडा आता संकटात आला आहे. हिरडा हा अत्यंत महत्त्वाचा वृक्ष असून त्याची कोवळी फळे धनेश सह अनेक पक्षी ही खातात. पक्व हिरडाचे बाह्य आवरण अत्यंत टणक असते . ते फळ निसर्गतः जमिनीत रुजून नवीन रोप उगने अत्यंत कठीण असते. सारंग कुळातील हरिण वर्गीय भेकर या शाकाहारी प्राणी हिरडा ची पक्व फळे जातो. त्याच्या पोटातील जठराम्ल त्यास मृदू बनवते व त्याच्या विष्टेतून बाहेर आलेले बीज जमिनीतील भेगा खाचा यात पडले की नवीन रोप निसर्गात रुजतात. शिकारी मुळे भेकरांची संख्या प्रचंड कमी झाली असून हिरडा रोपनास वनविभागाने प्राधान्य द्यावे असे डॉ. संतोष पाटील, अभिनव प्रतिष्ठान, सिल्लोड यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.
0 Comments