सत्तेचा महासंग्राम (डिजिटल मिडिया)
त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख झाले. नारायणगिरीजी महाराजांच्या नंतर त्यांनी गुरुवर्य मंहत उद्धवजी महाराज मंडलिक, यांचे वर केलेल्या अपार प्रेम व निष्ठाभावा पित्यर्थ मंहत गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांचे दशक्रिया विधी निमित्ताने येथे किर्तन सेवा दिनांक १७/ ११/ २०२५ रोजी संपन्न झाली. सदर प्रसंगी असंख्य जनसमुदाय उपस्थित होता. त्यात विशेषत्वाने कोपरगाव वैजापूर येवला राहाता तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते.
यावेळी त्यांनीदहाव्याच्या प्रसंगी परमपूज्य श्रद्धेय श्री उद्धवजी महाराज नेवासेकर यांचे कीर्तन झाले. त्यांनी कीर्तनाकरता घेतलेला अभंग -- याज साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चित तिने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया,कौतुक वाटे झालिया वेताचे नाव मंगळाचे तिने गुणे तुका म्हणे मुक्ती परली नवरी आता दिवसाच्यारी खेळीमेळी!! हा कीर्तनाकरता अभंग घेतला होता. यावेळी भरतजी महाराज डवाळकर , राजेश (आबा) परजणे , तसेच अॅड. प्रमोद दादा जगताप, रावसाहेब पा जगताप, महेंद्र शेट काले, सखाहारी पा चंदने, तनपुरे साहेब, ठोंबरे साहेब, प्रमोदजी लबडे ,इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते. सदर प्रसंगी उद्धव महाराज यांनी कै.नवले पा. यांचे नारायणगिरीजी महाराज यांचे वर असलेले प्रेम व जुन्या आठवणींना उजाळा देताना सांगितले कि,कै. निवृत्ती जगन्नाथ नवले पा हे आध्यात्मिक क्षेत्र व राजकीय क्षेत्रात नेहमी पुढे होते. गावचे हित व कुंटुबाची काळजी व प्रगती करताना कधीही मागे हटले नाही.कीर्तनात बोलताना ह भ प उद्धव महाराज मंडलिक म्हणाले की,विठ्ठल पंत व आईसाहेब यांनी आत्मदहन करण्याआधी श्री निवृत्ती दादा यांना सांगुन गेले होते तसेच निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांनी आयुष्याचे दोन दोन वर्षे वाढवुन घेतले होते व ज्या वेळी ज्ञानदेव माऊली समाधिस्त झाले. त्या वेळी निवृत्ती दादा हाय मोकलून रडले व पंढरी चे पांडुरंग ही रडले होते. त्या वेळी रुक्मिणी आई साहेबांनी विचारले की ह्या जन्म मुत्यु च्या फेरियातून कोणी सुटले नाही हे तुम्हांला माहीत असूनही तुम्ही का रडता? तेव्हा पंढरीचे पांडुरंग म्हणाले ,याच्या सारखा दुसरा ज्ञानी कोणी होणार नाही, तसेच येथील कै. नवले पा. हे ही हुशार व सर्व गुण संपन्न होते. त्यांनी आपल्या शिक्षणाचा गावासाठी व कुटुंब हितासाठी केला. त्यामुळे सर्वांना दुःख होत आहे. पुढे महाराज म्हणाले की खोपडी येथील कांदा पिकवणारे व कांदा नागपूर असेल हैदराबाद बंगलोर असेल अशा ठिकाणी नेऊन विकणारे निवृत्ती पा हे पहिले व्यक्ती होते. तसेच त्यांचे ब्रह्मलीन महंत नारायणगिरीजी महाराज व सरला बेटावर अति प्रेम होते. महाराजांनी काही सांगावे व गावाच्या मदतीने नवले पा यांनी लगेच ते पुर्ण करावे असे कैलासवासी नवले पाटील होते. असे यावेळी उद्धव महाराज यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.भरत महाराज डवाळकर यांनी सांगितले की ,कै.नवले पा. हे कांदे घेऊन नागपुरला गेले व येतांना खोपडी गावात पहिली स्पेंलडर गाडी नागपूर येथील प्रसिद्ध कांदा व्यापारी हाजी हैदर याची घेऊन आले व गाडी आल्यावर त्यांनी गाडीवर नारायणगिरीजी महाराज यांचे शेजारच्या तिन जिल्ह्यातील प्रत्येक किर्तन तेथे जाऊन प्रत्यक्ष ऐकले होते. असे ते मोठे धार्मिक होते.व नारायण गिरी महाराजांवर त्यांची मोठी श्रद्धा होती. सतत किर्तन ऐकण्याची त्यांची सवय होती. राजेश आबा परजणे यांनी यावेळी सांगितले की, संघ व नामदेवआण्णा यांचे वर कै. नवले पा. यांचे मोठे प्रेम होते व एकनिष्ठ पणा होता. यांची आठवण करून देत राजेश आबा परजणे पुढे म्हणाले की,कै. नवले पा यांना नामदेवरावआण्णानी काही दिले नाही पण तरीही त्यांचे आण्णावर खरे प्रेम होते व ते शब्दांचे पक्के होते. त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ते ती बदल नसत, सत्य त्यांना आवडत, खोट्याला कडाडून विरोध करणे, हा त्यांचा करारी बाणा होता .असे राजेशआबा पर्जन यांनी सांगितले.तर महेंद्र शेट काले यांनी कै. नवले यांची आध्यात्मिक आोढ व परमेश्वरावरील व गुरु वरील प्रेम घनिष्ठ होते .यांची आठवण करून दिली व नंतर खोपडी येथील डॉ बाबासाहेब जाधव यांनी यावेळी सांगितले की, कै. नवले पाटील हे येथे सरपंच असताना घरकुल प्रकरण विधानसभेत गाजले. परंतु त्यांनी खरेपणा सोडला नाही .वेळ प्रसंगी कोर्टात जाऊ पण ते सत्य सोडणार नाही असे ते सांगत.ते परमार्थ मार्गाने जिवन जगले. मोडलं पण वाकणार नाही, हे ब्रिद वाक्य घेऊन व गुरू आशिर्वाद या तत्त्वावर ते जिवन जगले .असे डॉक्टर जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी ह भ प उद्धव महाराज मंडलिक यांची किर्तन सेवा पार पडल्या नंतर महत गुरुवर्य उद्धवजी महाराज मंडलिक यांचे हस्ते श्री संदीप निवृत्ती नवले व सुनिल निवृत्ती नवले सोपान जग्गनाथ पा नवले यांनी व नवले कुटुंबिय यांनी राहत्या घराच्या शेजारी म्हसोबा मंदिरासमोर कै. नवले पाटील यांच्या स्मरणार्थ व त्याची आठवण म्हणून एक बेलाचे झाड महाराजांच्या हस्ते लावले.कै. नवले पा. याना परमेश्वराने सदगती देवो ,हिच प्रार्थना असे ह भ प उद्धवजी महाराज मंडलिक यांनी शेवटी म्हटले. यावेळी नवले परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार ,ग्रामस्थ, व भावीक उपस्थित होते.
0 Comments