दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी -महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्यामध्ये जिवंत सातबारा मोहिमे अंतर्गत गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या सातबारातील नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाची असल्याने जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन टाकळीभान येथील तलाठी रूपाली रामटेके यांनी केले.
टाकळीभान येथील ग्रामपंचायत कार्यालयात जिवंत सातबारा मोहिमेअंतर्गत चावडी वाचण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रामटेके बोलत होत्या.
यावेळी या मोहिमेची माहिती देतांना त्यांनी सांगितले की, मयत खातेदार यांच्या वारसांना शेत जमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी जिवंत सातबारा ही मोहीम राबविली जात आहे.
यासाठी वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे मृत्यू दाखला, वारसाबाबत सत्यप्रतिज्ञालेख, स्वंयं घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला, सर्व वारसांची नावे, वय, पत्ते व दुरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, रहिवासीबाबतचा पुरावा अशी कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांच्याकडे सादर करून या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन रामटेके यांनी केले.
आज या मोहिमेअंर्तगत ६ मयत खातेदारांच्या वारसांची प्रकरणे जमा झाली आहेत.
यावेळी संदिप जाधव, कोतवाल सदाशिव रणनवरे, एकनाथ सावंत, अशोक तुपे, राहूल म्हस्के, विशाल पटारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
(ऑनलाईन नेटवर्क डिजीटल मिडिया सहयोगी बातमीदार दिलीप लोखंडे टाकळीभान यांच्या सहकार्याने बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.)
0 Comments